रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

श्री कालेश्वर दुर्गा व दसरा उत्सव मंडळाला खासदार गवळी यांची भेट



नामदेवराव हजारे यांच्या वतीने भाविकांना 50 किलो साबुदाना उसळ वाटप

वाशीम : स्थानिक माहुरवेश येथील श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाला खासदार भावनाताई गवळी, नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबतच शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, बंडुभाऊ शिंदे, निलेश पेंढारकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी खा. गवळी व मान्यवरांनी  देवीच्या आरतीत सहभागी होवून देवीचे पुजन व दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव हजारे व इतर पदाधिकार्‍यांनी खासदार गवळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव हजारे यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी 50 किलो साबुदाना उसळीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार भावनाताई गवळी व मान्यवरांच्या हस्ते या उसळीचे वाटप भाविक भक्तांना करण्यात आले. या उसळीचा परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला. खा. गवळी यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दुर्गा उत्सव व दसरा उत्सव कार्यक्रमाची माहिती घेवून मंडळाच्या कार्याचे कौतूक केले. यावेळी श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव हजारे, उपाध्यक्ष स्वराज चौबे, लखन उपाध्ये, गणेश हजारे, महेश शर्मा, अंकित लोथ, सौरभ गट्टाणी, मनिष बत्तुलवार, गणेश बाळदी, रामचंद्र इंगळे, संतोष गोटे, सचिन लोलुरे, सुरज उपाध्ये, निलेश शर्मा, विजय शर्मा, अजय संगेवार, सोनुभाऊ गुप्ता, रवि हजारे, विठ्ठल हजारे, राजु हजारे, बंडु हजारे, राजु बाळदी, कपिल शर्मा, राहुल बानकर, पवन माळेकर, गोपाल सोळंके, गणेश श्रीखंडे, महेश हजारे, अक्षय हजारे, सोनु दिक्षीत, शिवानंद वाघमारे, नितीन ठाकुर, पवन ठाकुर, निरज ठाकुर, नरसिंह हजारे, स्वरनेश चौबे, सुरेश बैरवार, राहुल गंडागुळे, पप्पु भडंगे आदींची उपस्थिती होती.
-------------------------------------------------------
Samrat times

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा