रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

आज देवाळा संस्थानवर भव्य महाप्रसादाचे आयोजन


वाशीम : शहरापासुन पूर्वेकडे दोन किलोमिटर असलेल्या रेणूकामातेच्या देवाळा संस्थानवर सोमवार, 2 ऑक्टोंबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची बाबुभैय्या ठाकुर यांनी एका पत्रकाव्दारे दिली.
    प्रतिमाहूरवासीनी असलेल्या देवाळा येथील रेणूकादेवीच्या मूळ मंदिरावर दरवर्षी नवरात्रोत्सवात यात्रा भरते. या संस्थानवर इंजिनिअर अनिल केंदळे निसर्गरम्य परिसरात भव्य मंदिर उभारले आहे. या संस्थानवर माहूरची रेणूकामाता वसल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या संस्थानवर भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी या संस्थानवर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा वाशीम शहरासह सुरकंडी, फाळेगाव, दगडउमरा, काकडदाती तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन बाबूभैय्या ठाकूर यांनी केले आहे.
Samrat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा