मुंगळा प्रतिनिधी
शक्तीची देवता माता दुर्गा देवीची नऊ दिवस आराधना, उपवास करून भक्तीमय वातावरणात दसराचे सोने अर्पण करून मंगळवार दि.3 ऑक्टोंबर रोजी ढोलताश्याच्या गजरात गावातुन शोभायात्रा काढुन दुर्गा मातेचे विसर्जन शांततेत करण्यात आले.
मालेगाव तालुक्यातील ग्राम मुंगळा येथे 20 सप्टेंबर रोजी नऊ मंडळाद्वारे शक्तीची देवता दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली होती. मंगळवार दि. 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजता दरम्यान दुर्गा विसर्जन मिरवणुकीस सार्वजनीक नवदुर्गा मंडळांनी सुरवात केली यामध्ये सावता माळी नवदुर्गा मंडळ, नवयुवक नवदुर्गा मंडळ, तुळजा भवानी नवदुर्गा मंडळ, जय शिवाजी नवदुर्गा मंडळ, आदिवासी नवदुर्गा मंडळ, बाल शिवाजी नवदुर्गा मंडळ, सार्वजनीक आदिवासी नवदुर्गा मंडळांनी आपआपल्या परीने ढोलताशे पथक, बॅडपार्टी आदीचा वापर करून माळी वेटाळ मार्गे तेली वेटाळ, शिवाजी महाराज पुतळ्यासमोरून चावडी मार्गे जैन मंदीरासमोरून ग्रामपंचायत मार्गे काढण्यात आली.
यावर्षी नवयुवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी फेटे बांधुन विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावर्षी विसर्जन मिरवणुकीत भक्तामध्ये आनंद गगनामध्ये मावत नवता. दुर्गा विसर्जन मिरवणुकीत आदीशक्तीच्या नृत्यावर अश्वाने सुध्दा आनंद व्यक्त केला. सकाळी सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीचा संध्याकाळी आठ वाजता समारोप करण्यात आला. विसर्जन मिरवणुक संपल्यानंतर सर्व मंडळासमोर एकच प्रश्न पडला होता तो म्हणजे आता विसर्जन करायचे कुठे ? मात्र, विसर्जन करण्याची कुठल्याही प्रकारची तयारी नसल्याने सर्व मंडळाने आपआपल्यापरीने दुर्गा मातेचे विसर्जन केले.
मुंगळा येथे मांगील अनेक वर्षापासुन दरवर्षी दुर्गा मातेचे विसर्जन महादेव संस्थानच्या विहिरीमध्ये केले जात होते. मात्र, महादेव संस्थानच्या विहिरीतील गाळ न काढल्याकारणाने ति विहीर गाळाने भरली असल्याकारणाने दुर्गा मातेचे विसर्जन एक दोन वर्षा पासुन मेडशीच्या धरणावर करण्यात येत होते. मात्र, यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्या असल्या कारणाने धरणामध्ये पाणीच आले नाही. त्यामुळे दुर्गा मंडळासमोर यावर्षी प्रश्न निर्माण झाला. स्थानीक प्रशासनाने दुर्गा विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, स्थानीक ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील नागरीकांच्या समस्येचे काहीच देणे घेणे दिसत नसल्याचे दिसुन येते. पुढच्या वर्षी विसर्जनासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी गणेश व दुर्गामाता मंडळाची मागणी जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा