गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

भुलोंडा- शेमलाई गटग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी दुहेरी लढत


विनोद नंदागवळी
ग्राम पंचायत भुलोंडा येथे सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार सौ. मंदाताई  ओमप्रकाश ढोणे व सौ. संगीता सुभाष धाने  यांच्या मध्ये सरपंच पदासाठी लढत सुरु आहे. दोन्ही उमेदवारामध्ये अतिशय काट्याची टक्कर होत आहे. भुलोंडा ग्रामपंचायत हे गट ग्रामपंचायत असल्यामुळे यामध्ये सौ. ढोणे ह्या भुलोंडा येथील रहिवाशी आहेत व सौ. धाने  ह्या शेमलाई गावच्या आहेत. मतदानाचा विचार करता दोन्ही गटामध्ये अतिशय तंतोतंत मतदान आहे. त्यामुळे ह्या दोन उमेदवारांमध्ये जोऱ्याची लढत होणार आहे. सगळ्या गावकर्यांचे लक्ष आता दि. ०७/१०/२०१७ रोजीच्या निवडणुकीवर लागलेले आहे. कारण हि निवडणूक जातीस्तरातून होणार आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात दोन्ही गटात प्रचार सुरु आहे. त्यामध्ये सौ. ढोणे ह्या भारिप च्या उमेदवार ( युसूफ पुंजानी गट ) आहेत तर सौ. धाने ह्या अपक्ष उमेदवार आहेत. या दोन गटातील लढत हि चर्चेचा विषय ठरली आहे. तर ह्या दोन गटाचे भवितव्य आता युवा पिढीवर अवलंबून आहे. युवा पिढीचे असे मत आहे कि, नवीन चेहरा, नवीन काम असे आहे. आता भुलोंडा येथील गट ग्रामपंचायत निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे दमदाटीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सगळ्याचे लक्ष हे निवडणुकीकडे लागले आहे.

विनोद नंदागवळी
मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा