शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

कर्मवीर विद्यालयायमध्ये पोस्को-ई-बॉक्स व तक्रार पेटी बसवण्यासाठी ndmj निवेदन....!


पिलीव/सुजित सातपुते
 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दिनांक  4 अॉक्टोंबर 2016 रोजी परिपत्रकानूसार बालकांवर होणार्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आसल्यामुळे मुलांचे माणसि खच्चीकरण होते.मुलांना त्यांच्यावर होणार्या अत्याचाराची तक्रार कोठे करावी याची माहीती नसल्यामुळे आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत मुले कोणाकडेही याची वाच्यता करु शकत नाहीत व परिणामी अशा प्रसंगांना त्यांना बळी पडावे लागते.याबाबी विचारात घेवून राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण अयोगाने मुलांवर होत असलेल्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी www.ncpcr.gov.in या वेबसाईटवर पोस्को-ई-बॉक्स तयार केलेला असून सदर ठिकाणी प्रेस केल्यास तक्रार अयोगाकडे प्राप्त होते व त्या नूसार उचित कार्यवाही केली जाते असे नॕशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज (ndmj) चे राज्य सचिव वैभव गिते यांनी Sbn मराठीशी बोलताना सांगितले. तसेच 5 मे 2017 परिपत्रकानूसार सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याचे शासनाने आदेश दिले आहेत.तरी वरील दोन्हीं शासन निर्णयाची आपल्या शाळेमध्ये अंमलबजावणी व्हावी असे वैभव गिते यांनी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलिपे ज्युनिअर कॉलेज पिलीव या शाळेचे प्राचार्य लंगडे यांना निवेदन दिले.यावेळी रिपाइंचे रणजित सातपुते,रविंद्र झेंडे,सातपूते के.डी (मॕडम) यांसह शाळेतील शिक्षक व ndmj चे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा