शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षांनी केला पत्रकारांचा सत्कार.


माहूर (प्रतिनिधी )श्री रेणुकादेवी संस्थानने भाविकांसाठी केलेल्या सुख सुविधा,नवरात्र उत्सवात केलेले  धार्मिक विधी व घेतलेल्या विविध कार्यक्रमाची आपल्या वृत्तपत्रात सर्व दूरपर्यंत केलेली यथायोग्य प्रसिध्दी देवून केलेली मातेची सेवा ही प्रशंसनीय बाब असल्याचे उदगार    अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश सुधीर कुळकर्णी यांनी पत्रकारांचा सत्कार करतांना काढले.
       
   अष्टमीला सायंकाळी सहा वाजता  संस्थानचे अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश सुधीर कुळकर्णी यांनी संस्थानचे वतीने  बहूभाषिक  पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय आमले,उपाध्यक्ष जीतु चोले,सचिव राजू दराडे यांचे सह गजानन भारती,नितेश बनसोड,इलियास बावाणी राजठाकूर, कार्तिक बेहरे, जितेश जाधव , जयकूमार अडकिने,अविनाश टनमने,   आदि पत्रकारांचा मातेचा  प्रसाद देवून येथोचीत सत्कार केला.आज  अष्टमी   असल्याने परंपरेनुसार  रात्री अध्यक्ष तथा  जिल्हा सत्र न्यायाधिश सूधिर कूलकर्णी  पुजारी भवानीदास भोपी,प्रशांत भोपी यांचे हस्ते  होम हवन विधी संपन्न झाला.या विधीचे पौरोहित्य वे.शा.सं.विजय शास्त्री कोरटकर,चंद्रकांत रिठे,अनिल काणणव,श्रीपाद जगत यांनी केले.या वेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,विनायक फांदाडे, आशीष जोशी,समीर भोपी व श्रीपाद भोपी यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा