रिसोड : रिसोड वाशिम मार्गावर दि.२८ चे रात्रि ७ वा वनोजा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जख्मी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या ५ दिवसाच्या हिरनाच्या पिल्लाला उचलून आणले व त्याचे प्राण वाचविले. या बाबत सविस्तर वृत्त असे कि,रिसोड येथिल हिंदी वर्तमान पत्राचे पत्रकार शेख अन्सारोद्दीन हे आपल्या वाहनाने वशिमहून रिसोड कडे येत होते त्यांचे सोबत त्यांचे चुलत भाउ समीउद्दीन हे सुद्धा होते रात्रि ७ च्या सुमारास ते वनोजा पासुन काही अंतरावर होते तेव्हा त्यांचे लक्ष रस्त्यावर जख्मी अवस्थेत पडलेल्या ५ दिवसाच्या हीरनाच्या पिल्यावर पडली शेख यांनी आपले वाहन थांबविले व तडफडत असलेल्या पिल्याला पाणी पाजले व त्यास उचलुन रिसोड पोलिस स्टेशन ला आनले तेथे थानेदार राजेंद्र पाटिल याना याबाबत सविस्तर सांगितले असता थानेदार पाटील यांनी तत्काळ आपल्या कर्मचा-यांना आदेश दिले असता पोलिस उपनिरीक्षक रवि हुंडेकर व इतर कर्मचा-यांनी वनरक्षक व पशु वैद्यकिय अधिकारिना तत्काळ बोलविले. पशु वेद्यकिय अधीकारी अंकुश माहुलकर यांनी सहकारी साहील देबाजे सोबत हिरन च्या पिल्लयावर उपचार केले.उपचार केल्यावर पत्रकार शेख यानी वनरक्षक एच व्ही साठे याना हिरनाचा पिल्लू सुपुर्द केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एच जी कुलवंत,पोलीस उपनिरिक्ष व्हि आर रत्नपारखि,गिराम मेजर,सुनील पवार,गोपाल ठाकरे,चालक पारवे,महिला पोलीस कर्मचारी सोनाली, सैय्यद सलीम उपस्थित होते.
महेंद्रकुमार महाजन रिसोड
रिसोड प्रतिनिधी 9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा