बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम येथील नोंदणीकृत सर्व संबधित न्यासचे विश्वस्तांना आवाहन

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम येथील 
नोंदणीकृत सर्व संबधित न्यासचे विश्वस्तांना आवाहन

विनोद तायडे वाशिम

 सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम येथील नोंदणीकृत सर्व संबधित न्यासचे विश्वस्तांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त  व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 (3-ऐ) अन्वये तसेच धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार ज्या विश्वस्त व्यवस्थेच्या प्रयोजनाची संपूर्णपणे पूर्ती झालेली असेल किंवा विश्वस्त व्यवस्थेचे प्रयोजन बेकायदेशिर झालेले असेल किंवा विश्वस्त व्यवस्थेची मालमत्ता नष्ट केल्यामुळे अथवा तिच्या प्रयोजनाची पूर्ती करणे अशक्ये झाले असेल किंवा विश्वस्त व्यवस्था रद्द करण्यायोग्य असेल ती व्यक्तपणे रद्द केलेली  असेल किंवा विश्वस्त  व्यवस्थेच्या हेतूची पूर्तीसाठी विश्वस्त कोणतेही कार्य करीत नसल्याचे आढळून आलेले असेल किंवा विश्वस्तांनी गेल्या पाच वर्षाची हिशोबपत्रके/फेरफार अहवाल सादर केलेली नसतील अशा न्यासाची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. त्यानुसार या कार्यालयामार्फत ज्या विश्वस्त व्यवस्थांचे मागील पाच वर्षांपासूनचे बदल अर्ज /फेरफार अर्ज व मागील पाच वर्षांपासूनचे  हिशेबपत्रक/लेखे दाखल केलेले नाहीत, अशा विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबत  विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
तसेच ज्या विश्वस्तांना आपल्या विश्वस्त व्यवस्थेची स्वत:हून  नोंदणी रद्द करावयाची असेल अशा विश्वस्तांनी आपल्या न्यासाचे मुळ संस्था नोंदणीपत्र व न्यास नोंदणीपत्र ठरावासह दाखल केल्यास ते आपल्या विश्वस्त व्यवस्थेची नोंदणी रद्द करु शकतात.
तरी ज्या विश्वस्त व्यवस्थांचे विश्वस्तांना आपल्या न्यासाची नोंदणी रद्द करावयाची आहे अशा विश्वस्तांनी  या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ज्या विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्तांमार्फत बदल अर्ज/फेरफार अर्ज अद्यावत केले जाणार नाहीत अशा विश्वस्तांनी नोंदणी स्वयंखुद्द चौकशी करुन रद्द करण्यात येईल याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी. तरी वरील विशेष अभियानाचा विश्वस्तांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन एस.ए.बजाज, सहायक धर्मादाय आयुक्त, वाशिम यांनी केले आहे.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा