शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

महात्मा फुले भाजी मंडी संकुलाचे लोकनेते मा.मंत्री अनंतरावजी देशमुख यांच्या हस्ते उदघाटन


रिसोड शहरातील मुख्य बाजार म्हणून ओळख असलेल्या बाजार मंडी मध्ये अपुऱ्या जागेमुळे व्यापारी व भाजीपाला व फळविक्रेते दुकानदार यांना अडचण येत होत्या आणि बाजारात येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय व्हायची या बाबतीत व्यापारी व दुकानदार यांनी माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांची व भगवानराव क्षीरसागर यांची भेट घेऊन भाजी मंडीतील जुन्या जागेत जागा उपलब्ध करून संकुल बांधकाम करून देण्याबाबत चर्चा केली.व यामुळे मुख्य रस्त्यावर असलेली दुकाने मंडी मध्ये जातील व रस्ता मोकळा होऊन प्रवाशी व ग्राहकांची गैरसोय टाळल्या जाईल.अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला.या गोष्टीला त्वरित होकार देत मा.भाऊसाहेब यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना यासंदर्भात सूचना केल्या व हे काम त्वरित पूर्णत्वास करण्याचे सांगितले.सदर कामाचे उदघाटन आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मा.भाऊसाहेब व भगवानराव क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी संकुल उपलब्ध झाल्याने फळविक्रेते व भाजीपाला विक्रेते व व्यापारी यांच्यात आनंदाचे वातावरण होते.यावेळी सदर कामाचे उदघाटन फित कापून मा.भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी अँड.नकुलदादा देशमुख,माजी नगराध्यक्ष वसंतरावदादा इरतकर मुख्याधिकारी नगर परिषद सुधाकरजी पानझाडे,नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख, सहित सर्व नगरसेवक,माजी नगरसेवक, तसेच भाजीपाला,फळविक्रेते,व्यापारी व शहरातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Prabhakar Naikvade 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा