शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

मालेगांव येथील श्री सरस्वती विद्या मंदिर प्रा. शाळा,मालेगांव या ठिकाणी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र वाशिम व नेहरू युवा मंडळ कळम्बेश्वर यांच्या सयुक्त विद्यमाने मालेगांव येथील श्री सरस्वती विद्या मंदिर प्रा. शाळा,मालेगांव या ठिकाणी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी देवीदास सांगळे अध्यक्ष सरस्वती प्रा. शाळा मालेगांव तर उद्घाटक म्हणून नेहरू युवा मंडळ अध्यक्ष सचिन चतरकर व प्रमुख पाहुने म्हणून अनिल बळी, कपिल भालेराव ,सोनू बोराटे,वसंतराव गोटे व पंच म्हणून दीपक गोटे,सोनू कराले, संतोष कोंघे,विकास नवघरे यांची उपस्थिती होती.प्रथम दिप प्रज्वलित करण्यात आले आपल्या धकधकीच्या जीवनात क्रीडा क्षेत्राला अत्यंत महत्व आहे . आजचा युवक हा क्रीडा  क्षेत्रशी समरस झाला पाहिजे .त्याच्या त्याच्या जीवनातील क्रीडा चे महत्व लक्ष्यात घेऊन या क्षेत्रकडे जास्तीत जास्त युवक व युवतीनी सहभागी व्हावे असे प्रतिपादन सांगळे यांनी अध्यक्ष भाषणातुन सांगितले .यावेळी कबड्डी,फुटबॉल,धावने,गोळा फेक ,लांब उडी असे अनेक खेळ घेण्यात आले.या कार्यक्रमच्या यशस्वतेसाठी अनिल चतरकर,दत्ता मुठाळ,मंदार व्यवहारे,नारायण जाधव,राजू गवई यांनी परिश्रम घेतले.

SACHIN Chatarkar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा