वाशिम – येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे 61 वा धम्मचक्र परिवर्तन दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक मधुकर जुमडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर संघटनेचे कवि शेषराव धांडे,अजय ढ़वळे,राजकुमार पडघाण,प्रविण पटटेबहादुर,साहित्यिक महेंद्र ताजने धम्मपाल पाईकराव परमेश्वर अंभोरे होते.सुरवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी हारर्पन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.यावेळी मधुकर जुमडे, राजकुमार पडघाण ,शेषराव धांडे ,महेंद्र ताजने यांनी मार्गदर्शन केले.यावेळी या कार्यक्रमाला हंसिनी उचित,मनकर्णा पडघाण,सुभाष रोकडे,अशोक खिराडे,पवन राऊत,संतोष इंगळे,अड़ निरंजन इंगोले,राम शृंगारे,वाय के इंगोले, निलेश भोजने, ग .ना.कांबळे,निवृत्ति सरकटे,इत्यादि अनेक जण यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रविण पट्टेबहादुर यांनी केले.तर अरविंद उचित यांनी केले.
Samrat time's

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा