सम्राट टाइम्स ब्युरो
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव पि.ड़ी.कढणे याच्या वर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आहेत याबाबत चे पत्र मालेगाव सभापतींना दि.27/09/17 ला देण्यात आले आहे.
दि.10/5/17ते 31/5/17 ला तुरी ची नोंदणी करण्याचे कामकाज शासण निर्देशक दि 16/5/17 च्या नुसार बाजार समिती च्या स्तरावर चालु होते . 31/5/17 पर्यंत ची नोंद घेवून सचिव ,सहायक निबंधक तथा सहकारी संस्था याच्या स्वाक्षरी ने संबंधीत कार्यालयात सादर करायचे होते तरी सुद्धा कुठलीही माहीती सादर केली नाही तरी 31/5/17 पर्यंत नोंदणी करण्यात आली होती त्या पेक्षा अधिक तुर खरेदी केल्या स्पष्ट झाले त्या मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्या मध्ये पि.ड़ी.कढणे यांनी असमाधानकारक खुलासा केल्यामुळे पि.ड़ी कढणे याच्या वर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 कलम 40 ई नुसार तत्काळ निलंबन ची कार्यवाही करण्याचे आदेश आर.एन.कटके जिल्हा उपनिबंधक यांनी दिले आहेत
सम्राट टाइम्स ब्युरो

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा