वाशिम - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा 60 वा वर्धापन दिन महामेळावा मंगळवार, 3 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजता शिर्डी येथील के.सी. पांडे मैदानात आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे राहतील. तर महसुल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे मेळाव्याचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, ना. महादेव जानकर, पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, ना. विनायकराव मेटे, खासदार सदाशिव लोखंडे, रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर यांची उपस्थिती राहील. तरी या वर्धापन दिन व महामेळाव्याला रिपाइंच्या जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकत्यार्र्नी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्यासह कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, आश्रुजी रोकडे, डॉ. रमेश वानखडे, भारत खडसे, युवा आघाडी अध्यक्ष जय वानखडे, रोजगार आघाडी अध्यक्ष सुखदेव खोडके, बौध्द महासभा संयोजक अभिनेते अरविंद उचित, प्रशांत सुर्वे, उल्हास इंगोले, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश गवई, जिल्हा नेते रवी भगत चिखली, हिरामन साबळे, मिलींद इंगोले, परशराम वासनिक, मिलींद सोनोने, जयचंद खाडे, दयाराम खाडे, दिपक भगत, गोविंदराव इंगोले, शाहीर विश्वनाथ इंगोले, भिमराव लबडे, सुखदेव सरकटे, संजय भिसे, विलास शिरसाट, कैलास मैंदकर, दिलीप कांबळे, रामदास भगत, देवबा मोरे, सिध्दार्थ पट्टेबहादूर, ज्ञानेश्वर अढागळे, राजेश खडसे, गणेश जगताप, महेंद्र वानखेडे, राहुल सुर्वे, पंढरी कंकाळ, सुखदेव मैदकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकत्यार्र्ंनी केले आहे.
Samrat time's

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा