( फाईल फोटो)
गुडमाँर्निग पथकाची हवा गुल
किन्हीराजा येथे गाव हागणदरी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला असून गुडमाँर्नीग पथकाची हवाच गुल झाली असल्याने गाव हागणदारी मुक्त होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे मिनिमंत्रालय असलेल्या ग्रामपंचायत सदस्याकडेच शौचालय नसल्याची गंभीर बाब समोर आली असताना जिल्हा परिषद अशा सदस्यांवर कार्यवाही का करत नाही हे एक कोडेच आहे सद्या जिल्ह्यात गाव हागणदरी मुक्त अभियानाचे वारे जोरात वाहत आहेत शौचालय बांधकामासाठी शासन निधी देत आहे मात्र येथे शौचालय निधी हडप केल्या गेला आहे खऱ्या लाभार्थ्यांना मात्र शासन निधीपासून वंचित ठेवण्यात आल्याने ग्रामस्थाचा मनात संताप पसरला आहे ग्राम पंचायत सदस्यांचे शौचालय कागदावरच आहेत
गाव हागणदरी मुक्त करण्यासाठी ग्रामस्थ उत्सुक अाहेत मात्र त्यांना पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही आजही ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचास बसत असल्याने हागणदरी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे.
महादेव हरणे
9922224889
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा