बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

मेडशी येथे शांतता समिती बैठक संपन्न




प्रवीण घुगे मेडशी

मेडशी येथे दुर्गाउत्सव, मोहरम  आणि धम्मचक्र प्रवर्तन  दिन तीन उत्सव एकाच वेळी साजरे होत आहेत. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी मेडशी पोलीस चौकीमध्ये शांतता समिती बैठक ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाला तंटा मुक्त समिती अध्यक्ष शौकतअली पठाण, उपसरपंच मूलचंद चव्हाण, कनिष्ठ अभियंता निर्मळ, पोलीस पाटील अनिता चोथमल , माजी जमादार शिवराम तायडे पत्रकार विनोद तायडे, सुभाष तायडे, अजय चोथमल, शेख अनिस,प्रसाद पाठक विठ्ठल भागवत,ग्राम पंचायत सदस्य गणेशराव घुगे ,शेख जमीर, कैलास इंगळे आणि प्रदीप पाठक, शेख शेरुभाई ,उत्तम देशमुख ,बद्रीभैय्या केवट आदीसह तंटामुक्त समिती पदाधिकारी, सदस्य, दुर्गा उत्सव, मोहरम आणि धम्मचक्र प्रवर्तन उत्सव समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची उपस्थिती होती.यावेळी  ठाणेदार सुरेश नाईकनवरे ,तंटामुक्त समिती अध्यक्ष शौकतअली पठाण, पत्रकार विनोद तायडे यांची समायोजित भाषणे झालीत . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर तिखीले आणि पोलीस कर्मचारी टाले यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार ग्राम पंचायत कर्मचारी शेख जावेद यांनी मानले

प्रवीण घुगे मेडशी
9921444908

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा