शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

काळाकामठा आश्रमशाळेची मान्यता रद्द

काळाकामठा आश्रमशाळेची मान्यता रद्द 

विनोद तायडे वाशिम

  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत एकुण 19 अनुदानीत आश्रमशाळा कार्यरत आहेत. अनुदानीत आश्रमशाळा काळाकामठा ता. मालेगाव जि. वाशिम या अनुदानीत आदिवासी आश्रम शाळेची मान्यता आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2017 रोजीच्या आदेशान्वये मान्यता रद्द केली आहे.
करीता सदर आश्रमशाळेमध्ये प्रवेशित 1 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये या करीता सदर विद्यार्थ्याचे प्रवेश सदर आश्रम शाळेच्या जवळ असलेल्या शासकीय/अनुदानीत आश्रम शाळेमध्ये करण्याची कार्यवाही या कार्यालयामार्फत सुरु आहेत. सदर आश्रमशाळेच्या जवळ शासकीय आश्रमशाळा मुसळवाडी, शासकीय आश्रमशाळा कोथळी, शासकीय आश्रमशाळा किन्हीराजा, अनुदानीत आश्रमशाळा अंधारसावंगी, शासकीय आश्रमशाळा शेलुबाजार इत्यादी आश्रमशाळा आहेत. करीता पालकांना विनंती करण्यात येते आहे की, आपल्या पाल्यांचा प्रवेश उपरोक्त आश्रमशाळांमध्ये करावा. तसेच याबाबत आपणास काही अडचण आल्यास या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07242425068 यावर संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी केले आहे.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा