शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

मंगरूळपीर तालुकावाशियांच्या ऐन पावसाळ्यात घशाला कोरड

मंगरूळपीर तालुकावाशियांच्या ऐन पावसाळ्यात घशाला कोरड                                                                                                  
                        
फुलचंद भगत

मंगरूळपीर-पान्याचा प्रश्न हा अतिशय गंभिर प्रश्न असुन याची झळ सध्या मंगरुळपीर तालुकावाशियांच्या ऐन पावसाळ्यात घशाला कोरड पडल्याने जिव लाहीलाही होत होत आहे.पावसाळ्याचे तीन महीने उलटून ही अद्याप पर्येत मुबलक प्रमाणात
पाऊस न पडल्या मुळे शेती पिके हातची जाऊन पिण्याच्या पाण्याचे सर्व जलाशयाला
कोरड पडली आहे. यावर्षी वाशिम जिल्यात सर्वात कमी पावसाची नोंद या तालुक्यात
असून  सोयाबीन हे महत्वाचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे .
तालुक्यातील लहान तलाव कोरडी ठण असून जी बारमाही धरणे आहे त्यामधे मोजकाच
जलसाठा शिल्लक राहिला असून तालुकाभर पाणी टंचाई होनार आहे खरीपाची पिके सुकून
गेली आता पुरेशा पाऊस अभावी विहीरी धरणात पाणीसाठा नसल्याने रब्बीचा हंगाम
होण्याची सूतरामही शक्यता नाही शेतकऱ्यांसह मजूरवर्ग ही निराशेच्या गर्तेत
सापडला आहे.मागील आठवड्यात झालेल्या अत्यल्प पावसाने पिकांना कुठलाही फायदा
मिळाला नाही तालुक्यातील मजूरवर्ग रोजगाराविना घरी तर शेतकरी कर्जमाफिचा अर्ज
ऑनलाइन भरण्याकरीता सेतुकेंद्रावर गर्दी करीतआहे .
न्यायालयीन प्रकिर्येत अडकलेली दारूची दुकाने सुरू झाली पण ,शासनाच्याऑनलाईन
लालफीतशाहीत शेतकर्याची कर्जमाफी रेंगाळल्यामुळे शेतकरी मात्र पुरता हवालदिल
झाला आहे.तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे सर्वच
पक्षीय राजकारणी मंडळी या प्रश्नाला बगल देत असल्याचे चित्र दिसत
आहे.दुष्काळाचे सावट असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे बार धाबे खानावळी
फुल्ल आहेत .सरपंच पदाची निवड थेट जनेतून असल्यामूळे दोन दोन वेळी मेजवाणी
देऊन कार्यकर्त्याची व मतदारांची मर्जी राखण्यात येत आहे .सर्वच
पक्षश्रेष्ठींची आपलाच सरपंच झाला पाहिजे याकरीता रणनीति आखने सुरू केले आहे
मात्र दुष्काळी सावटामुळे सामान्य ग्रामीण मतदार सध्यातरी निवडणूकीच्या दूर
असल्याचे जाणवत आहे मंगरूळपीर तालुक्यात कमी पावसामुळे शहरातील बाजारपेठेतही
ग्राहकांची वर्दळ कमी होऊन व्यापार थंडबस्स्त्यात जात आहे .
तर मंगरूळपीर शहराला पाणी पुरवठा करणारा मोतसावंगा प्रकल्पही कोरडा होत असून
काही दिवस पुरेल येवढेच पाणी शिल्लक आहे.परतीचा मान्सून तालुक्यात बरसला नाही
तर मंगरूळपीर शहरावरील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे उपलब्ध
जलसाठ्यातून शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला होत असून पाणीटंचाईचे
भीषण संकट आ वासुना उभे असतां नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मग्रूर
कर्मचारी पाईपलाइनच्या वॉल्वमधून हजारो लीटर शुध्दपाणी वाया घालत आहे याकडे
सम्बंधीत अधिकार्यानी लक्ष पुरविणे गरजेचे झाले आहे.काही छूटपुट घटना सोडल्यास
तालुक्यासह शहरात शांतता कायम आहे.येणाऱ्या आगामी सणउत्सवावर दुष्काळाचे सावट
राहणार येवढे मात्र खरे.                                         फुलचंद भगत,
मंगरुळपीर                                
9763007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा