शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

निर्यातक्षम भाजीपाला, फळांच्या नोंदणीसाठी ‘अपेडा फार्मर कनेक्ट’ अॅप

निर्यातक्षम भाजीपाला, फळांच्या नोंदणीसाठी ‘अपेडा फार्मर कनेक्ट’ अॅप


विनोद तायडे वाशिम

निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, आंबा इत्यादी फळबाग आणि भेंडी, कारली, भोपळा, मिरची, तोंडले, शेवगा, कडीपत्ता इत्यादी १५ प्रकारच्या भाजीपाला पिकाची नोंद करण्यासाठी ‘अपेडा’ने अपेडा फार्मर कनेक्ट (Apeda Farmer Connect) अॅप तयार केले असून आता शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल वरून नोंदणी करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.

‘अपेडा फार्मर कनेक्ट’ अॅप आपल्या मोबाईल प्ले-स्टोअर आणि ‘अपेडा’च्याhttp://apeda.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. निर्यातक्षम डाळिंब पिकाची नोंदणी ‘अपेडा फार्मर कनेक्ट’ अॅप, आपले सरकार पोर्टल व पूर्वीप्रमाणे कृषि विभागामार्फत अपेडाच्या संकेतस्थळावर देखील नोंदणी करता येईल. सन २०१६-१७ या वर्षात ‘अनारनेट’ प्रणालीवर ९४ डाळिंब प्लॉटची नोंदणी झालेली होती. सन २०१७-१८ मध्ये वाशिम जिल्ह्यासाठी डाळिंब नोंदणीचे २५० हेक्टर प्लॉट नोंदणीचे उद्दिष्ट प्राप्त आहे. ही नोंदणी दि. २१ सप्टेंबर ते दि. ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत करता येणार आहे.

‘अपेडा फार्मर कनेक्ट’ अॅप विषयी तांत्रिक माहितीसाठी आपल्या गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी अरविंद गुमडे (भ्रमणध्वनी क्र. ८८५६८६२६६९), संगणक चालक धीरेंद्र देवहंस (भ्रमणध्वनी क्र. ८२७५३१२१८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री. गावसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा