पंचायत समिती मानोरा अंतर्गत गुड मॉर्निंग पथकाची धडक मोहीम 35 लोटा बहाद्दरावर दंड वसुलीची कार्यवाही
महादेव हरणे प्रतिनिधि
आज दि. 23 रोजी सकाळी 4 ते 8 वाजे दरम्यान ग्राम पंचायत विठोली, गव्हा, कारखेडा, सोमनाथ नगर , माहुली, अभाईखेडा, साखरडोह या गावांमध्ये केलेल्या मेगा गुड मॉर्निंग मध्ये जिल्हा चमूने श्री विनायक साने, श्री शंकर आंबेकर, नोडल अधिकारी मुकुंद आंधळे यांच्या नेतृत्वात केलेल्या मेगा गुड मॉर्निंग मध्ये 35 लोटा बहाद्दरावर दंड वसुलीची धडक कार्यवाही करण्यात आली त्यामुळे मानोरा तालुक्यात उघड्यावर जाणाऱ्यांचे धाबे दणाणले या पथकामध्ये वि अ श्री वाघमारे, brc श्री आखाडे, ग्राम सेवक श्री दिघोडे, खाडे, चिकटे, लोनकर, पिंपळकर, लुंगे, चवरे, सोनटक्के, वाळूकार, सौ.राठोड, सौ. खंगार, सौ. पाटणकर, सौ. करवते, सौ. मोरे, सौ वानखडे, व अनिता सहस्त्रबुद्धे वाशिम तसेच त्यांचे पथक, यांचा समावेश होता.
पोलीस स्टेशन मानोराचे श्री मयघणे व त्याच्या चमूचे विशेष सहकार्य लाभले ही कार्यवाही सतत चालू राहील असे नोडल अधिकारी श्री विनायक साने यांनी सांगितले.
महादेव हरणे
9922224889


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा