शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

प्रा. अरविंद माळी यांचे व्यक्तिमत्व विकास शिबीर

प्रा. अरविंद माळी यांचे व्यक्तिमत्व विकास शिबीर

विनोद तायडे वाशिम

, 24 सप्टेंबर रोजी स्थानिक लाखाळा येथील महात्मा फुले लॉनमध्ये सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत एकदिवशीय खुल्या व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या शिबीरात जेष्ठ सामाजीक प्रबोधनकार प्रा. अरविंद माळी नागपूर हे मार्गदर्शन करणार आहेत.
    अखिल भारतीय माळी महासंघ, माळी कर्मचारी सेवा मंडळ, माळी युवा मंच व सावित्री महिला मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत या शिबीरास महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक, सामाजीक संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सौ. किरण गिर्‍हे, अ.भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, माळी कर्मचारी सेवा मंडळाचे तालुका अध्यक्ष प्रशांत मोहळे, माळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नागेश काळे, योगेश उलेमाले, रवि इंगोले, संभाजी साळसुंदर, गजानन राऊत, सौ. पूजा उलेमाले, सौ. अलका धामणकर, अरविंद उलेमाले, सौ. रेखा राऊत, प्रा. रमेश इंगोले, बालाजी बगाडे, माणिक उलेमाले, ज्ञानेश्वर वाशीमकर, प्रशांत भडके, अमर जाधव, महेश राऊत, कृष्णा इंगळे, सुनिल जाधव आदींसह पदाधिकार्‍यांनी केले.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा