शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

अडोळी येथे एकाच दिवशी चार शौचालय कामास प्रारंभ

अडोळी येथे एकाच दिवशी चार शौचालय कामास प्रारंभ

विनोद तायडे वाशिम

वाशीम : संपूर्ण देशात भारत स्वच्छता मिशनव्दारे स्वच्छता हिच सेवा म्हणून गावोगावी शौचालयाचे बांधकाम होत आहे. त्याच अनुषंगाने वाशीम जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या नेतृत्वात, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजु सरतापे, माहिती व संवाद अधिकारी राम श्रृंगारे यांच्या पुढाकारात संपुर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रसार आणि प्रचार सुरु आहे.
    त्यानिमित्ताने तालुक्यातील अडोळी येथे स्वच्छता प्रेरक राजकुमार पडघान, देवेंद्र खंडारे व वनिता डाखोरे यांनी गावातील जनतेस घरोघरी शौचालय बांधावे म्हणजे आपले गाव हागणदारी मुक्त होईल असे सांगुन 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता देवेंद्र खंडारे, प्रल्हाद खंडारे, देवराव जाधव व संदीप खंडारे यांच्या घरी शौचालय बांधकाम कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छता प्रेरक राजकुमार पडघान यांनी अडोळीवासीयांना शौचालयाचे महत्व पटवून सांगीतले. आणि चारही शौचालयाचे उद्घाटन केले. यावेळी केशव डाखोरे, देवेंद्र खंडारे, वनिता डाखोरे, दौलत पडघान यांच्यासह गावातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन दौलत पडघान यांनी तर आभार केशव डाखोरे यांनी मानले.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा