शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण

लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण

विनोद तायडे वाशिम

 महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) तेजस्विनी प्रकल्प व समन्वयीत कृषि विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६ लोकसंचालित केंद्रांना (सीएमआरसी) आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण करण्यात आले. ‘माविम’ प्रांगण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ‘माविम’चे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी रविकांत घाटोळ, जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे, समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाचे सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी सर्जेराव ढवळे आदी उपस्थित होते. महिला बचत गटांची फेडरेशन म्हणून काम करणाऱ्या ६ लोकसंचालित केंद्रांना ‘माविम’च्या ‘तेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टरसह ट्रॉली, रोटावेटर, नांगर, पंजी व कल्टीवेटर तसेच समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाच्या माध्यमातून थ्रेशरचे वाटप करण्यात आले. लोकसंचालित साधन केंद्राद्वारे महिला बचत गटांना हे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे महिला बचत गटातील सदस्य महिलांना शेतीच्या कामामध्ये वेळेत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, महिला खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे आवश्यक आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्यामाध्यमातून जिल्ह्यात सुरु असलेल्या महिला बचत गटांद्वारे महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदत केली जात आहे. या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे वाटपाचा उपक्रम महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरेल. महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी होणाऱ्या प्रयत्नांना महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपला बचत गट सक्षम करण्याचा प्रयत्न करावा.

याप्रसंगी माविमचे श्री. घाटोळ, समन्वयीत कृषि विकास प्रकल्पचे श्री. ढवळे यांच्यासह महिला बचत गटांच्या सदस्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा