मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांचा ईशारा
निवडणुकीतील उमेदवारांसह ग्रामसेवकांवर होणार कारवाई
पडताळणीसाठी जिल्हा परिषदेत विशेष पथकाची स्थापना
व्हॉट्सअप क्रमांकावरही माहिती देण्याचे लोकांना आवाहन
दि. 16
जिल्ह्यातील एकुण 289 ग्रामपंचायतीमध्ये टप्प्या टप्प्याने निवडणुका होत असुन यापौकी सध्या पहिल्या टप्प्यातील 273 ग्रामपंचायती मधील उमेदवारांकडुन उमेदवारी अर्ज सादर करण्यात येत आहेत. कोणत्याही निवडणुकीला उभे राहणाज्या उमेदवारांकडे शौचालय असणे बंधनकारक असल्याचे निवडणुक आयोगाने जाहिर केले आहे.
अशावेळी अनेक उमेदवारांकडुन शौचालय असल्याचा खोटा दाखला जोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र आता यापुढे असे झाले तर त्या उमेदवारांसह संबंधित ग्रामसेवकांवरही कठोर कारवाई करण्याचा ईशारा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिला आहे.
दाखला द्या पण वस्तुस्थिती पाहुन..
निवडणुक असलेल्या गावातील उमेदवारांना शौचालयाचा दाखला देतांना संबंधित ग्रामसेवकांनी वस्तुस्थिती पाहुनच दाखला द्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केले आहे. शौचलय असणाज्यांना व ते वापरत असलेल्यांना शौचालय असुन ते त्याचा नियमित वापर करतात असा दाखला द्यावा. पण शौचालय नसल्यास शौचालय नाही असाच दाखला द्यावा. तसेच शौचालय असुन त्याचा वापर करत नसलेल्यांना शौचालय आहे परंतु त्याचा वापर करत नाहीत असा दाखला द्यावा आणि त्यावर लाल शाईने शेरा द्यावा असे निर्देश सीईओ पाटील यांनी दिले आहेत.
व्हॉटस्अप क्रमांकावरील माहितीची दखल
ज्या गावात निवडणुक आहे, त्या गावातील लोकांनी शौचालय नसलेल्या अथवा असुनही त्याचा वापर न करणाज्या उमेदवारांचे नाव आणि गावाचे नाव जि. प. च्या 8975767749 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मँसेज करण्याचे आवाहन जि. प. प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. लोकांचे नाव गुप्त ठेऊन संबंधितांवर निवडणुक नियमाचा भंग केल्याचा व खोटी माहिती देऊन निवडणुक अधिकाज्यांची दिशाभुल केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीईओ पाटील यांनी नियंत्रण कक्षाला दिले आहेत.
जिल्ह्यातील बहुसंख्य गावात निवडणुका असल्याने मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. या पाश्र्वभूमिवर शौचालय दाखल्याची पडताळणी करण्यासाठी जि. प. मध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडील माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या या इशारयामुळे खोटे दाखले देणाज्या ग्रामसेवकांसह काही उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे. यानिमित्ताने शौचालय बांधकामाला गती मिळेल अशी अपेक्षा उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी व्यक्त केली आहे.
महादेव हरणे
9922224889
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा