![]() |
| लोकवस्तीत मुख्यरस्त्यावर असलेली घाण |
प्रभागात मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य
किन्हीराजा मध्ये सार्वजनिक एकही प्रसाधनगृह नाही
नागपुर औरंगाबाद महामार्गावर असलेल्या ग्राम किन्हीराजा जवळपास अकरा हजार लोकसंख्या असुन महामार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्दळ असुन बसथांब्यासह आठवडी बाजार ग्रामपंचायत शाँपींग सेन्टर मुख्य रहदारीचे ठिकाणावर प्रसादणगृह नसल्यामुळे ग्रामस्थ व्यापारी वर्ग बाहेर गावावरुन येत असलेले नागरीकासह महीला वर्गांची मोठ्याप्रमाणात कुचंबना होत आहे तसेच याच ठिकाणावरून शाळा व विद्यालया मध्ये जाण्याचा मुख्यमार्ग असुन या मार्गाचा उपयोग शौच करण्यासाठी करण्यात येत अाहे त्यामुळे मार्गावरून जात विद्यार्थीनींना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे स्वच्छता मिशन किन्हीराजा मध्ये कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे गावामध्ये सुध्दा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असुन ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात येजा करतांना रोडवरील साचलेल्या डबक्यामुळे त्रास सहण करावा लागत आहे साचलेल्या डबक्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा वर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वारंवार ग्रामस्थांनी संबंधितास लेखी निवेदन देऊनही त्यावर कोणत्याच प्रकारच्या उपाय योजना ,हालचाली करतांना दिसुन आले नाही संबंधित प्रशासन किंवा आरोग्य विभागाने त्वरीत दिलेल्या विनंती अर्ज व निवेदणाची दखल घेउण गावातील घाणीच्या समस्यांचा कायम स्वरूपी नायनाट करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा