शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

किन्हीराजा पोलीस चौकीचा कारभार 36 वर्षापासुन चालतो अपुर्या व खाजगी इमारतीत

किन्हीराजा पोलीस चौकीचा कारभार 36 वर्षापासुन चालतो अपुर्या व खाजगी इमारतीत 
याच चौकीतुन चालतो 23 गावांचा कारभार














3 तपानंतरही पोलीस चौकीची अवस्था बिकटच 



4 पोलीस कर्मचार्यांवर 23 गावांचा भार

                            वाशिम जिल्हातील नागपुर औरंगाबाद महामार्गावरील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकीची स्थापना सन 1980 मध्ये करण्यात आली असुन या चौकी अंतर्गत 23 गावांचा समावेश  करण्यात आला आहे परंतु गेल्या 36 वर्षापासुन स्वमालकीची ईमारत होण्यासाठी आणखी किती तप पुर्ण होण्याची वाट पाहावी लागणार असा प्रश्न ऊपस्थीत केल्या जात आहे ग्रामपंचायत कार्यालय परीसरात 10*15 च्या छोट्या समाज मंदीराच्या खोलीत पोलीस चौकीचा कारभार कित्येक वर्षापासुन चालु आहे. ही इमारत खुप जुनी असल्यामुळे इमारतीवरील स्लँबही काही वर्षापुर्वी कोसळलेला आहे.  या चौकीमध्ये स्नानगृह प्रसादनगृह ( शौचालय) व पाण्याची कोणत्याच प्रकारची सुविधा या इमारतीमध्ये नाही त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे मंगरुळपीर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या सोयता भोयता सह दुधखेडा तोरनाळा कार्ली किनखेडा जोडगव्हाण गुंज बोराळा एरंडा मैराळडोह गणेशपुर गिव्हा उमरदरी काळामाथा कवरदरी वाडीरामराव  पिंपळशेंडा सोनाळा वाकापुर दुबळवेल आदी लहाण मोठे 23 गावांचा किन्हीराजा पोलीस चौकी अंतर्गत समावेश आहे मुख्यता किन्हीराजा हे गांव अकरा हजार लोकसंख्या असलेले नागपुर औरंगाबाद महामार्गावर वसलेले आहे महामार्गावर अपघाताचे  प्रमाण नित्याचेच झाले आहे त्यामुळे आधीच 23 गावांचा पोलीसावर ताण व महामार्ग झाल्यामुळे आणखीनच त्या मध्ये भर पडली आहे चौकीवर फक्त 4 कर्मचारी आळीपाळीने  कारभार पाहत आहेत व कित्येक दिवसापासुन 10*15 खोलीत पोलीसांचा श्वास कोंडल्या जात आहे पोलीस चौकी अंतर्गत गावांचा विचार करता सद्याची चौकीची जागा अपुरी व सर्व सुविधांचा अभाव त्या मध्ये दिसुन येत आहे पोलीसांना काम करतांना तर जागे अभावी काही लोकांना चौकीच्या बाहेर बसवु आपले काम करावे लागत आहे.या  लक्षवेधी मागणी कडे वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षीका   पाटील मँडम व राजकिय नेत्यांनी लक्ष केंद्रीत करून किन्हीराजा पोलिस चौकीच्या नविन इमारतीचा प्रस्तावाचे गृहमंत्र्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.

महादेव हरणे 
9922224889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा