रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

चिमुकल्या पुर्वाने केला बेटी बचावचा जागर

चिमुकल्या पुर्वाने केला बेटी बचावचा जागर 






  विनोद तायडे वाशिम

               स्थानिक जानकीनगर येथे कु. पुर्वा निलेश सोमाणी हिने 17 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करुन स्थानिक अकोला नाका येथील मॉ गंगा हॉस्पीटल येथे मुलींना जन्म देणार्‍या मातांचा सन्मान व बेटी बचाव बेटी पढाव चा जागर केला. स्थानिक मॉ गंगा हॉस्पीटल येथे कु. पुर्वाच्या हस्ते शिरीन परवीन शेख इमरान वाशीम, कु. पुर्वी रविंद्र अवगण पिंप्री अवगन व कु. समृध्दी तांबेकर कळमेश्वर या मुलींचा गुलाबपुष्प तथा त्यांच्या मातांचा राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा, फळे व खेळणे देवून सत्कार केला. सोबतच हॉस्पीटलचे संचालक डॉ. हरिष बाहेती, डॉ. सचिन बाहेती व बेटी बचाव बेटी पढावचे संयोजक डॉ. दिपक ढोके यांनी चिमुकल्या पुर्वाचा बेटी बचाव बेटी पढावचे सन्मानपत्र देवून व आरोग्यदायी वस्तु देवून सत्कार केला. सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांची पुर्वा ही कन्या आहे. डॉ. ढोके व सोमाणी यांनी जिल्हयात बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबवून लग्नसमारंभात पर्यावरण व बेटी बचावचा आठवा व नववा फेरा, जनजागृती रथयात्रा समवेत विविध उपक्रम राबवून अभियानाला गती दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आयोजक निलेश सोमाणी समवेत हॉस्पीटलच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
--------------------------------------------------------------
सदर उपक्रमाची प्रत्येकांनी प्रेरणा घ्यावी - डॉ. ढोके
    आज स्त्री जन्मदर जिल्हयात कमी असून याबाबत मोठया प्रमाणात अभियान राबविणे गरजेचे आहे. मुलींच्या पालकांनी तिच्या वाढदिवसानिमित्त विविध रुग्णालयात जावून स्त्रीजन्माचे स्वागत करुन मातांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविला तर त्या पालकांचा व मुलींचा बेटी बचाव बेटी पढावच्या वतीने आकर्षक सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात येईल. सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांनी कन्या पुर्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवा उपक्रम राबवून आदर्श पायंडा निर्माण केला आहे. या उपक्रमाची प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी व बेटी बचाव बेटी पढावचा गजर करावा असे आवाहन डॉ. दिपक ढोके यांनी केले.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा