रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

साडे आठ तासाच्या भारनियमनाचा किन्हीराजा ग्रामस्थांना फटका

साडे आठ तासाच्या भारनियमनाचा किन्हीराजा ग्रामस्थांना  फटका 

           
                  किन्हीराजा  येथील 33 के व्ही उपकेंद्रा अंतर्गत         सकाळी 5 ते 10 वाजेपर्यत तर संध्याकाळी 5 ते साडे आठ पर्यत तब्बल साडे आठ तासाचे भारनियमन एकाच दिवसाला घेण्यात येत असल्यामुळे वृद्ध नागरीक व लहान मुलांना भारनियमनाचा आत्योनात त्रास सहण करावा लागत असुन अापतकालीन भारनियमनाच्या नावावर काही दिवसापासुन भारनियमन दररोज घेण्यात येत आहे जेव्हा विजेची अत्यावश्यकता असते त्याच वेळी भारनियमन घेण्यात येत असल्यामुळे महावितरण विरोधात तिव्र संताप नागरीकातुन व्यक्त करण्यात येत आहे . गावामध्ये मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ  हे भारनियमनामुळे डासांच्या तडाक्यात सापडत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परीणाम होत आहेत त्यामुळे सणासुद्धी काळा मध्येच थंडी तापेच्या रूग्णामध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे  मर्यादित काळापुरतेच भारनियमन घेण्यात येत असल्साचे महावितरण कडुन सांगण्यात येत असले तरी भारनियमनाच्या त्रास हा मोठ्याप्रमाणात लहान मुलांसह ग्रामस्था नाहक सहण करावा लागत आहे त्यामुळे त्वरीत भारनियमनाच्या वेळेमध्ये बदल करून भारनियमनाचे तास कमी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महादेव हरणे
9922224889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा