वाशीम : येत्या शनिवार, 30 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात आयोजीत धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले.
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता धम्मध्वजारोहण व धम्मवंदना घेण्यात येईल. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करोडो जनतेसह नाग नदीच्या काठी दिक्षाभूमि या मातीत रक्तविरहित क्रांती घडवून आणली. 14 ऑक्टोबर 1956 साली एक विज्ञानवादी तथागत बुद्धाचा धम्म देवून प्रगतीच्या वाटेवर आणले. या दिवसाचे स्मरण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तरी या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भिमराव कांबळे, तेजराव वानखडे, मधुकरराव जुमडे, अॅड. संजय इंगोले, डॉ. रमेश वानखडे, परमेश्वर अंभोरे, अनंतराव तायडे, जग्गु राऊत, डॉ. सहदेव चंद्रशेखर, अनंतकुमार जुमडे, अरविंद उचित व शेषराव मेश्राम यांनी आवाहन केले
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा