सम्राट टाइम्स ब्युरो
वाशिम, दि. २९ : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २०१८ ही दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यात घेतली जाणार आहे. याकरिता परीक्षेची आवेदन पत्रे दि. २५ सप्टेंबर ते दि. २५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात स्वीकारली जाणार आहेत. महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र (सी. एस. सी.) येथून ही ऑनलाईन आवेदन पत्रे भरता येतील, असे वाशिम जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी. के. घोगरे यांनी कळविले आहे.
सम्राट टाइम्स ब्युरो

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा