वाशीम : विजयादशमी निमित्त श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता स्थानिक माहुरवेश रावणदहन मैदानात रावणदहन व भव्य आतिशबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार भावनाताई गवळी, नगराध्यक्ष अशोक हेडा, डॉ. हरिष बाहेती, जुगलभाऊ मालपाणी, सुरेशभाऊ लोथ यांची उपस्थिती राहील. यावेळी मुख्य कार्यक्रमानंतर भव्य आतिशबाजीचा डोळ्याचे पारणे फेडणार्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरीकांनी रावणदहन व भव्य आतिशबाजीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव हजारे, उपाध्यक्ष स्वराज चौबे, लखन उपाध्ये, गणेश हजारे, महेश शर्मा, अंकित लोथ, सौरभ गट्टाणी, मनिष बत्तुलवार, गणेश बाळदी, रामचंद्र इंगळे, संतोष गोटे, सचिन लोलुरे, सुरज उपाध्ये, निलेश शर्मा, विजय शर्मा, अजय संगेवार, सोनुभाऊ गुप्ता, रवि हजारे, विठ्ठल हजारे, राजु हजारे, बंडु हजारे, राजु बाळदी, कपिल शर्मा, राहुल बानकर, पवन माळेकर, गोपाल सोळंके, गणेश श्रीखंडे, महेश हजारे, अक्षय हजारे, सोनु दिक्षीत, शिवानंद वाघमारे, नितीन ठाकुर, पवन ठाकुर, निरज ठाकुर, नरसिंह हजारे, स्वरनेश चौबे, सुरेश बैरवार, राहुल गंडागुळे, पप्पु भडंगे आदींनी केले आहे.
Samrat time's

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा