शिवसेनेच्या धरणे आंदोलनात शेकडो शिवसैनिक व शेतकरी सहभाग
विनोद तायडे वाशिम
वाढलेले भारनियमन, बिघडलेले रोहित्र यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसेना तालुका व शहर शाखेच्या वतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार तसेच खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात बुधवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यात वाढलेले भारनियमन बंद करणे, शेतकर्यांच्या शेतातील बिघडलेले रोहित्र त्वरीत दुरुस्ती करणे, शेतकर्यांच्या मागणीनुसार त्यांना रोहित्र तातडीने उपलब्ध करुन देणे, कृषीपंपाची प्रलंबित विज जोडणी त्वरीत देणे अशा शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. सकाळी 11 वाजतापासून दुपारी 2 वाजेपर्यत धरणे आंदोलन राबविण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान भारनियमनाच्या प्रश्नासह तालुक्यातील शेतकर्यांच्या विविध समस्यांचा येत्या एक महिन्यात निपटारा करण्यात येईल असे आश्वासन अधिक्षक अभियंत्यांनी दिले.
या धरणे आंदोलनामध्ये माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, बाजार समिती सभापती सुरेश मापारी, जि.प. सदस्य हरिदास कोरडे, पं.स. सदस्य भगवान ढोके, उपतालुकाप्रमुख विजय खानझोडे, गजानन इढोळे, नारायण गोटे, दत्ता पायघन, खविस संचालक पांडुरंग पांढरे, सर्कलप्रमुख बालु माल, गणेश इंगोले, दिपक इढोळे, प्रल्हाद गावंडे, सखाराम चौधरी, उध्दव महाराज खंडारे, राजाभैय्या पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. मंगलाताई सरनाईक, ज्योती खोडे, संगीता पिंजरकर, रुख्मीना चोपडे, सुनिता गव्हाणकर, केशव डुबे, बंडु शिंदे, विशाल खंडेलवाल, रामदास ठाकरे, संतोष सुर्वे, रामहरी राऊत, सागर जोगदंड, रंजन कव्हर, गोपाल लव्हाळे, अनिल नागलकर, लक्ष्मण गाभणे, संजय बेंद्रे, इंगळे, संजय पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकर्यांनी सहभाग घेतला.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा