बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

ग्रामसेवकावर कारवाईसाठी येवती ग्रा.पं.सदस्याचा उपोषणाचा इशारा

तक्रारीचा ढीग तरीही कारवाई शुन्य

ग्रामसेवकावर कारवाईसाठी येवती ग्रा.पं.सदस्याचा उपोषणाचा इशारा

विनोद तायडे वाशिम

 नियमित ग्रामसभा न घेण्यासह गावाच्या विकासाची भूमिका न घेणारे तसेच ग्रा.पं. सदस्यांना कोणतीच माहिती न देणारे रिसोड तालुक्यातील येवती येथील ग्र्रामसेवक पी.डी. देवढे या ग्रामसेवकावर कारवाईसाठी ग्रा.पं. सदस्य अनिल अशोक शिंदे यांनी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांना 16 सप्टेंबर रोजी निवेदन देवून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
    याबाबत ग्रा.पं. सदस्य अनिल अशोक शिंदे यांनी जिल्हा परिषदेला 16 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मी येवती ग्रा.पं. सदस्य असून मी ग्रामसेवक पी.डी. देवढे 15 ऑगष्ट रोजी ग्रामसभा आयोजीत करण्याबाबत व गावातील सांडपाणी, पाणीपुरवठा, पथदिवे, संडास अनुदान, विहीर अनुदान, घरकुल अनुदान, प्रोसिडींग ठराव आदींची माहिती मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र सदर ग्रामसेवकाने याबाबत कोणतीही सहकार्याची भूमिका न ठेवता उध्दट वर्तन केले. यासंदर्भात 20 ऑगष्ट, 29 ऑगष्ट व 6 सप्टेंबर रोजी सदर ग्रामसेवकाविरुध्द गटविकास अधिकारी रिसोड यांना निवेदन देवूनही सदर निवेदनावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याखेरीज काहीही केले नाही. तरी सदर निवेदनावर त्वरीत कार्यवाही करुन कर्तव्यशुन्य ग्रामसेवकावर कारवाई करावी. अन्यथा जिल्हा परिषदेसमोर लोकशाही पध्दतीने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा ग्रा.पं. सदस्य अनिल शिंदे यांनी जि.प.ला दिला आहे. निवेदनाच्या प्रती लोकप्रतिनिधी, आमदार यांना देण्यात आल्या आहेत.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा