गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

स्वच्छता ही सेवा अंतर्गत तर्‍हाळा हागणदारीमुक्त घोषित

स्वच्छता ही सेवा उत्सव   
                

 स्वच्छता ही सेवा अंतर्गत तर्‍हाळा हागणदारीमुक्त घोषित

फुलचंद भगत
मंगरुळपीर-दि. 21
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील तज्हाळा हे गाव हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले. या निमित्ताने गावात हागणदारीमुक्तीचा स्वच्छता उत्सव साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या हस्ते दि. 19 रोजी गावातील फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
आपले गाव हागणदारीमुक्त होणार म्हणुन मंगळवारी सकाळपासुनच गावात उत्साहाचे वातावरण होते. शाळेतील विद्याथ्र्यांनी गावातुन स्वच्छता रॅली काढुन स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभाग नोंदविला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खैरे आणि आणि गावातील नागरीकांच्या पुढाकाराने गावातील मुख्य चौकात श्रमदान करण्यात आले. यानंतर गावातील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात गावातील स्वच्छतादुतांचा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काही स्वच्छतादुतांनी मनोगत व्यक्त केले.
*मागे बसविल्याची बाब खटकली*
स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा स्तरीय कार्यशाळेत स्वच्छतेमध्ये कमी काम असलेल्या गावातील सरपंच व सचिवांना जि. प. प्रशासनाने मागे बसविल्याची बाब खटकली असल्याचे भावना या गावातील वामन चाबुकस्वार आणि बाळु गावंडे यांनी बोलुन दाखवली. गावात आल्यावर ग्रामसेवकाच्या सहकार्याने गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये जि. प. आणि पंचायत समितीच्या मार्फत आलेल्या गुड मॉर्निंग पथकांनी उघड¶ावर जाणाज्या व्यÜक्तकडुन बाराशे रुपये दंड करण्यात आला तेव्हा गावात शौचालयाच्या कामाने गती घेतल्याचे या गावातील स्वच्छतादुत आणि ग्रा. प. सदस्यांनी सांगितले.
*लग्नापुर्वी शौचालय बांधणाज्या युवकाचा सत्कार*
शौचालय नसणाज्या गावातील पवन गावंडे या युवकाने आपले लग्न पुढे ढकलले. अनेकवेळा घरी आलेल्या पाहुण्यांना परत पाठविले. आपल्या होणाज्या बायकोला शौचासाठी उघड¶ावर जायची वेळ येऊ नये म्हणुन घरीशौचालय बांधल्यानंतर आपण लग्न करणार असल्याचे पवन याने जाहिर केले होते. या बाबीची परिसरात चांगलीच चर्चा झाली होती.  यानंतर ग्रामपंचायत आणि नातेवाईकांनी दबाव आणल्यानंतर पवनच्या वडीलांनी घरी शौचालय बांधले. दि. 19 रोजी जेव्हा गावात हागणदारीमुक्तीचा उत्सव साजरा केला जात होता तेव्हा या भावी नवरदेवाचा सत्कार जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
*वर्तणुकीत बदल घडवुन आणण्यासाठी स्वच्छता ही सेवा कार्यक्रम: सीईओ पाटील*
लोकांच्या वर्तणुकीत बदल घडवुन स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम राबविला जात असल्याचे विचार मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही सेवा अंतर्गत तज्हाळा हे गाव हागणदारीमुक्त झाले आणि गावाने हागणदारीमुक्तीचा उत्सव साजरा केला याबद्दल सीईओ पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, सुमेर चाणेकर, गटविकास अधिकारी खौरे, गट शिक्षण अधिकारी मंजुशा कौसल मिनी बीडीओ भिकाजी पद्मने, राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम  इस्कापे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावाने आपला हागणदारीमुक्तीचा दर्जा टीकवुन ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशिल रहावे असे आवाहन त्यांनी केले. ग्रामसेवक शिवा राठोड यांनी या गावाचा हागणदारीमुक्ती कडील प्रवास उलगडुन दाखविला. कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य मधुकर गावंडे, वामनराव चाबुकस्वार, दिनकर भगत, विनोद भाके, अमरदिप देशमुख, सुधाकर पाटील, रणजित गावंडे, दिलीप बायस्कर, गुणाभाऊ कराके, शिरवभाऊ वाघमारे, शबाना बी कुरेशी आदिंसह शालेय विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन रविंद्र वाढणकर यांनी केले.
फुलचंद भगत
9763007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा