लहुजी शक्ती सेेनेचे न.प. मुख्याधिकार्यांना निवेदन
विनोद तायडे वाशिम
शहरातील रावणदहन मैदानाजवळील माहुरवेश वस्तीतील नाल्या व परिसरातील घाण साफ करण्यासह वस्तीमध्ये रस्ते बांधुन रहीवाशांना होत असलेल्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी न.प. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष अशोक हेडा यांना निवेदन देवून करण्यात आली. लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराज दुतोंडे यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, आजच्या परिस्थितीत भारत देशाने स्वच्छतेला प्रथम क्रमांक दिला आहे. स्वच्छता अभियानाअंतर्गत आज देशात सर्वत्र स्वच्छतेची मोहीम सुरु आहे. असे असतांना शहरातील गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील माहुरवेश वस्तीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भुयारी गटार योजनेच्या अर्धवट कामामुळे वस्तीमधील नाल्या पुर्णपर्ण फुटुन त्यामधील घाण पाणी घरांमध्ये घुसत आहे. तसेच खोदलेल्या रस्त्यावर लोकांचे चालणेही कठीण झाले आहे. नाल्यांची अनेक दिवसांपासून साफसफाई करण्यात न आल्यामुळे सदर नाल्या ह्या घाणीचे गच्च भरलेल्या आहेत. या घाण पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरली असून विविध रोगराईयुक्त जीवजंतुमुळे येथील लहान बालके, वृध्द नागरीक आदींना मलेरीया, डायरीया, टायफाईड आदी विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र घातक मच्छरांचा सुळसुळाट झाला आहे. रस्ते इतके खराब झाले आहेत की, वस्तीतील एखादा माणूस गंभीर आजारी असला तर त्याला न्यायला अॅटो सुध्दा घरापर्यत येत नाही. नगर परिषदेने स्वच्छतेची मोहीम नुसती कागदावर न राबविता शहरातील गोरगीब वस्तीमध्ये नियमितपणे साफसफाई करावी. तसेच माहुरवेश येथील नाल्याची साफसफाई करुन रहिवाशांना रोगराईमुक्त करावे. तसेच वस्तीमधील एकाही खांबावर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधार पडतो. त्यामुळे या भागातील खांबावर दिवे लावण्यात यावे. वरील सर्व गैरसोयी नगर परिषदेने त्वरीत दुर करुन येथील गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराज दुतोंडे, शहर अध्यक्ष दिपक साठे, माहुरवेश शाखा अध्यक्ष तुषार खडसे, रामदास आव्हाडे, रवि गायकवाड, युवा अध्यक्ष शिवाजी इंगळे, केशव वानखेडे, विनोद गवळी, जनार्दन खडसे, जिल्हा सचिव अंकुश आमटे आदी उपस्थित होते
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा