गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ कारंजाचे दहा दिवस विविध कार्यक्रम
विनोद तायडे वाशीम
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ संचालित कारंजा येथील जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून मंडळाच्या वतीने दहा दिवस विविध सामाजीक, धार्मिक कार्यक्रम व विविध स्पधार्र्ंचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह संजय कडोळे यांनी दिली. मंडळाचे यंदाचे सलग 28 वे वर्ष आहे.
गुरुवार, 21 सप्टेंबर रोजी देवीची स्थापना झाल्यानंतर 5 ऑक्टोंबरपर्यत जगदंबेच्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध धामिक कार्यक्रम, गोंधळ, जागर, भजनस्पर्धा आयोजीत केल्या असून जयजगदंबेचा जोगवा मागून समाजातील दु:खे, दारिद्रय, रोगराई, संकटे, व्यसनाधिनता, हुंडाप्रथा, अंधश्रध्दा, जनतेच्या ग्रहपिडा, मंगलदोष, साडेसाती, पितृदोष दुर करुन सर्वत्र सौख्य, समाधान, आनंदी, उत्साही वातावरण राहावे व चोहीकडे पाऊस होवून दुष्काळमुक्त धरणी व्हावी यासाठी गोंधळी या नात्याने जगदंबेला दहा दिवस साकडे घातल्या जाणार आहे. तसेच विविध अन्नदात्यांकडून जोगवा मागून दहाव्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केल्या जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला व महाप्रसादाला भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ कारंजाचे अध्यक्ष विजय पाटील खंडारे, उपाध्यक्ष उमेश अनासने, प्रमुख कार्यवाह राष्ट्रीय लोककलावंत संजय कडोळे यांनी केले आहे.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा