सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

शिवसेनेचा कर्ज मुक्ती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

शिवसेनेचा कर्जमुक्ती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला



विनोद तायडे वाशिम

शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आल होते . त्यानुसार वाशीम जिल्हयात विदर्भ संपर्क नेते तथा परिवहन मंत्री मा. दिवाकरजी रावते साहेब यांच्या आदेशानुसार 11 सप्टेंबर  ला दुपारी छत्रपती शिवाजी चौकातून शिवसेनेचा कर्जमुक्ती मोर्चास प्रारंभ झाला  . हजारोच्या संख्येने  मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला .यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले .
  शेतकर्‍यांना दसर्‍यापुर्वी कर्जमुक्त करण्यात यावे, मुग, उडीद, सोयाबीन ही पिके अल्पपावसामुळे नष्ट झाली असून या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, पिकविमा व कर्जमुक्तीची अर्जाची तारीख वाढवून देण्यात यावी, पिकविम्याचे ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात आले परंतु रक्कम भरुन घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिला असल्यामुळे पिकविम्याचे अर्ज आँफलाईन भरुन रक्कम भरुन घेण्यात यावी, शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरतेवेळी शेतकर्‍यांचे अंगठे जुळत नसल्यामुळे बरेच अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळेच शेतकर्‍यांचे अर्ज ऑफलाईन भरुन घेण्यात यावे. कर्जाचे पुनर्गठन अद्याप करण्यात आलेले नसून त्यासंबंधीचे आदेश संबंधीतांना तात्काळ देण्यात यावे आदी मागण्यार्थ  नेतृत्व खासदार भावनाताई गवळी व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील  यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला  मोर्चा छत्रपती शिवाजी चौक, पाटणी चौक, अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयवर धडकला  . मोर्चात जिल्हयातील शेतकरी बांधवांसह शिवसेनेचे कार्यकर्ते हजारोच्या   संख्येने  सहभागी झाले  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, चंद्रशेखर देशमुख, भागवत गवळी, दिनेश राठोड, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, महादेव ठाकरे, संतोष सुरडकर, अनिल पाटील राऊत, रवि पवार, नरहरी कडू, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, अरुण मगर, संतोष जोशी, विवेक नाकाडे, राजु देशमुख, गणेश बाबरे आदीसह हजारो  शिवसैनिक व  शेतकरी सहभागी झाले .

,विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा