सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

रिसोड तहसिलवर लोककलावंताचा विशाल मोर्चा धडकला

   रिसोड तहसिलवर लोककलावंताचा विशाल मोर्चा धडकला


विनोद तायडे

विदर्भ लोककला मंच नागपूर च्या वतीने आयोजित लोक कलावंतांच्या  विविध मागण्यार्थ  धडक भव्य मोर्चा विदर्भ नेते दत्तराव  धांडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालयावर धडकला .यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
लोककलावंतावर नेहमीच अन्याय होत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे लोककला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. लोक कलेतील अनेक प्रकार आजही देशात आपले अस्तित्व टिकवून आहे. सरकार मात्र उदासीन असल्याने विदर्भ नेते दत्तराव धांडे यांची लोककलावंतांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे .याचं महिन्यात वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर लोक कलावंताचा ऐतिहासिक  मोर्चा धडकला होता .त्याच धर्तीवर रिसोड येथे विशाल मोर्चा ची सुरुवात संत अमरदास बाबा मंदिरापासून करण्यात आली .मोर्चामध्ये सर्वच समाजाचे  कलावंत  पारपपारीक वेशभूषेत  सहभागी झाले .मोर्चा मध्ये लोक कलावंतांनी आपली कला सादर केली.  तहसिलदार यांना  विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . कृषी उत्पन्न बाजार समिती येथे  लोक कलावंतांना भव्य मेळावा घेण्यात . यावेळी मान्यवरांची भाषणे झालीत .
 मोर्चात वाशिम व बुलढाणा जिल्हयातील हजारो लोक कलावंत सहभागी झालेत


विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा