सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. अरुण ए. राऊत रुजू

जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. अरुण ए. राऊत रुजू  

विनोद तायडे
वाशिम
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर डॉ. अरुण ए. राऊत हे आज रुजू झाले. डॉ. एन. बी. पटेल हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. भुलतज्ञ डॉ. अनिल कावरखे, डॉ. जांभरूणकर, डॉ. धोत्रे, नेत्रतज्ञ डॉ. बाहेकर, डॉ. लोणकर, डॉ. अवचार यांनी यावेळी डॉ. राऊत यांचे स्वागत केले.

रुग्णसेवेची जबाबदारी व गुणवत्तापूर्ण सेवा, प्रेरणा प्रकल्प, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, नवजात शिशुना गुणवत्तापूर्ण सेवा, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम व मा. पंतप्रधान यांच्या प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला एएनसी तपासणी व लसीकरण, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक, अधिकारी व कर्मचारी यांचे हक्क व कर्तव्यांची जपणूक करण्याबाबत विशेष भर देणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा