मोठे ध्येय ठेवतांना पावले जमिनीवरचे ठेवा- अलका कुबल
विनोद तायडे
वाशिम
तुम्ही तुमचे शिक्षण आणि लग्न, प्रपंच संसार पूर्ण तर करालच. पण ते करतांना मोठे ध्येय डोळयासमोर ठेवा ध्येय मिळत असतांनाच आपले भान कायम ठेवून आपली पावले जमिनीवरच असू द्या, असा संदेश सिने चित्रपट सृष्टीतील सर्व माहेरवाशीणींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी विद्यार्थीनींना दिला. डॉ. तात्याराव लहाने -अंगार व येणाऱ्या चित्रपटाच्या प्रोमोजसाठी त्या मां गंगा मेमोरिअल बाहेती हॉस्पीटल वाशीम येथे बोलत होत्या. यावेळी मंचावर निर्माता, दिग्दर्शक मधुमालती वानखडे,समाजसेवक मारशेटवार,डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती, सरस्वती समाज महाविद्यालयाच्या प्रा. राठोड मॅडम यांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले. सौ. अलका कुबल यांचे स्वागत डॉ. सौ. सरोज बाहेती यांनी केेले तर निर्माता, दिग्दर्शक विराग मधुमातली यांचे स्वागत डॉ. हरिष बाहेती यांनी केले.
आपल्या सहज सुंदर संवादातून अलका कुबल यांनी आपल्या आयुष्याचा पट रसिकांसमोर मांडला. मी आजपर्यंत अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. माहेरची साडी येण्या पूर्वी 30 चित्रपटात माझ्या भूमिका झाल्या होत्या. यश मिळायला उशिर लागला. म्हणून खचली नाही. नित्य नविन प्रयत्न करीत राहिले. 1991 मधील माहेरच्या साडीने मला रसिक प्रेक्षकांनी भरभरून आशीर्वाद दिला. तरी मी साधीच राहिले. यश डोक्यात शिरू दिले नाही. त्यामुळे फक्त प्रयत्नच करत राहिले तेच करत राहणे योग्य असते. यशाची हवा डोक्यात गेल्याने आज उध्वस्त झालेले अनेक कलाकार मी बघितले आहेत, असे होवू देवू नका. पाय जमिनीवरच असु द्या असे मनोगत अलकाताई कुबल यांनी व्यक्त केले.
आपल्या कल्पनांमध्ये निर्मीतीची शक्ती असते. ती कल्पना प्रथम मनात आणा आणि ती पूर्ण करून वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा असो संदशे विराग मधुमालती वानखडे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या मनोगतातून दिला. डॉ. तात्याराव लहाने ह्या अत्यंत सामान्य परिस्थीतीत आयुष्य गेलेल्या व्यक्तीने केवळ स्वत:च्या जिद्द आणि ज्ञानाच्या आधारावर समाजसेवेत आदर्श घालून दिला. या व्यक्तीचे आयुष्य जर सामान्य जनतेसमोर आले तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल ह्या भावनेने मी ही चित्रपट निर्मीती करीत आहे. ज्या डॉ. लहाने सरांनी अनेकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून अनेकांना दृष्टी दिली ह्याच ध्येयानुसार ह्या चित्रपटाच्या प्राप्तीतून वैयक्तीक खर्च न करता त्यामधून दोन नेत्र शस्त्रक्रिया रूग्णालयाची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. अशा चित्रपटातून आपल्या सर्वांना निश्चित प्रेरणा मिळेल असे सांगून त्यांनी 6 ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट आपण जरूर जरूर चित्रपटगृहात जावून बघावा असे आवाहन केले. ह्या चित्रपटामध्ये रिले सिंगिंगचा प्रथम उपयोग करण्यात आला. 108 शब्दांचे गीत 300 कलाकारांनी-गायकांनी सुरात म्हणणे हा विश्वविक्रम म्हणून नमूद झाला हेही त्यांनी सांगीतले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. हरिष बाहेती यांनी सांगीतले की, आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणाने वाशीम परिसरात जनजागृती तर होतेच परंतू समाजसेवेत संस्कार सुध्दा रूजविल्या जातात. त्यामुळे आमच्या संस्थाना अशा कार्याची माध्यमातून दाखविल्या जाणारा चित्रपट डॉ. तात्या लहाने-अंगार निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे सांगीतले. कार्यक्रमाला डॉ. प्रा. उल्हे मॅडम, प्रा. गजानन वाघ, डॉ. प्रा. शुभांगी दामले, डॉ.सौ. संगीता बाहेती, आरोग्य सेवक वर्ग तसेच शहरातील बहुसंख्य नागरिक व मॉ गंगा नर्सिंग स्कुलच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा