माहेश्वरी संघटनेच्या ‘संघटन आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिसाद
विनोद तायडे वाशिम
वाशिम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेच्या वतीने जिल्हयात 9 व 10 सप्टेंबर रोजी विदर्भ अध्यक्ष मदनलाल मालपाणी, उपाध्यक्ष अॅड. अशोक भंडारी, जिल्हाध्यक्ष शेखर बंग यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात संघटन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येवून संपुर्ण जिल्हयातील सहाही तालुक्यात पदाधिकार्यांनी संपर्क अभियान राबवून माहेेश्वरी समाजबांधवांना मार्गदर्शन, आर्थिक सर्वेक्षण व समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेकडून देण्यात येत असलेल्या सहाय्याबाबत माहिती दिली. धनज बु. येथील आपादग्रस्त आत्माराम सोमाणी यांच्या परिवाराला 40 हजार रुपये तर मंगरुळपीर येथील केशव गोरक्षण संस्थेला 21 हजार रुपयाची आर्थिक सहायता संंघटनेच्या वतीने देण्यात आली. स्थानिक शांतीनिकेतन येथे आयोजीत बैठकीला विदर्भ अध्यक्ष मदनलाल मालपाणी, अॅड. भंडारी, जिल्हाध्यक्ष शेखर बंग, सचिव शिवलाल भुतडा, कैलास मुंदडा, राजकुमार मुंदडा, भगवानदास दागडीया, जमनादास बाहेती, मुकेश चरखा, डॉ. हरिष बाहेती, श्रीराम राठी, सुनिल गट्टाणी, जिल्हा संघटक निलेश सोमाणी, धोंडूराम तोष्णीवाल, तालुका अध्यक्ष सचिन करवा, सचिव मनिष मंत्री, कैलास मुंदडा, डॉ. अशोक बंग, आशिष लढ्ढा, अनिल तापडीया, चरखा, तिलक बियाणी, दिपक लाहोटी, प्रा. अनिल बजाज आदींची उपस्थिती होती. 9 सप्टेंबर रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात ठिकठिकाणी संघटन पदाधिकार्यांनी जावून समाजबांधवांशी चर्चा केली तर 10 सप्टेंबर रोजी वाशीम, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा तालुक्यात संपर्क अभियान राबविण्यात आले. अनसिंग येथे बालाजी मंदिरात बैठकीचे आयोजन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप बजाज यांनी केले होते. मानोरा येथे बैठकीला उद्योजक राधेशाम हेडा, गोपाल लाहोटी समवेत समाजबांधव उपस्थित होते. मंगरुळपीर येथे आयोजीत बैठकीत केशव गोरक्षण संस्थेच्या वतीने नरेंद्र बजाज, संतोष बियाणी, नंदलाल जाखोटीया यांनी 21 हजाराचा धनादेश स्विकारला. धनज येथे समाजसेवी रुपेश बाहेती यांच्या पुढाकाराने आयोजीत बैठकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालाजी मंदिरात पार पडलेल्या बैठकीत धनज बु. येथील वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाकरीता वास्तुशांतीची रक्कम दिड लाख रुपये गावाला देणारे रुपेश बाहेती व शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे 16 हजार रुपये रक्कम देणारे निलेश सोमाणी यांचा विदर्भ अध्यक्ष मदनलाल मालपाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मालपाणी यांनी समाजात संघटन असणे जरुरी असून संघटन शक्तीव्दारे विविध समस्येचे निराकरण होवू शकते. समाजाने दुर्बल आर्थिक घटकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. सोबतच ठिकठिकाणी समाजबांधवांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देवून त्यांचे समााधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शेखर बंग, संचालन कैलास मुंदडा तर आभार निलेश सोमाणी यांनी केले.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा