मानोरा येथून जवळच कारंजा महामार्गावर असलेल्या श्री क्षेत्र इंझोरी येथे अडाण नदीच्या पात्रामध्ये अडाण तिर्थावर इंझोरीवासियांनी भव्य असे जगदंबा देवीचे मंदीर बांधकाम केलेले आहे. सदरहु क्षेत्र हे निसर्गरम्य वातावरणामध्ये असून नवसाला पावणारी जागृत ग्रामदैवत जगदंबा देवी सर्वत्र सुप्रसिद्ध आहे.
नेहमी येथे भाविक भक्तांची वर्दळ पाहायला मिळते. तसेच जगदंबेच्या साक्षांत्काराने व जगदंबेच्या चमत्कारांचा अनेकांना अनुभव आलेला आहे. यंदा अश्विन नवरात्रोत्सवानिमित्त 21 सप्टेंबर 2017 रोजी घटस्थापना झाली असून नवरात्रोत्सवाला सुरूवात झालेली आहे. 24 सप्टेंबर 2017 रोजी नवरात्रोत्सवामध्ये जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ कारंजा तथा जय भवानी जय मल्हार गोंधळी वाघेमुरळी कलासंच कारंजाचे कलावंत ह.भ.प. संजय काडोळे, कमलेश कडोळे, दिनेश कडोळे, प्रतिक हांडे, उमेश अनासाने, सौ. इंदिराबाई मात्रे, श्रीमती कांताबाई लाखंडे, ह.भ.प. अजाब महाराज ढळे इत्यादी मंडळींचा जागर गोंधळाचा हा कार्यक्रम होणार आहे. 22 सप्टेंंबरला जोगव्याचा कार्यक्रम, 27 ला होम-हवन कार्यक्रम, 29 ला कन्या भोजन, 30 ला देवीला सोने अर्पण तसेच दररोज सकाळी 7, दुपारी 12 व रात्री 7 ला महाआरती होईल. तसेच दररोज इंझोरी निवासी ग्रामस्थांतर्फे भजन, किर्तन, सत्संग इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र इंझोरी येथील नवदुर्गा विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे मंदीर समितीच्या अध्यक्षा माँ जिजाबाई सलामे तथा उपाध्यक्ष ह.भ.प. चंद्रभान महाराज दिघडे, माँ जगदंबा संस्थान ट्रस्ट (रजि.न.239) इंझोरी, ता. मानोरा जि. वाशिम यांनी कळविले आहे.
सरदहु मंदीराच्या परिसरात जगदंबेची दिपमाळ, सभामंडप, वॉल कंपाउंड, महाद्वार, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावयाचे असल्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे, त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाकरिता अन्नदान, देणगी, गहु, तांदुळ, साखर, तेल, इत्यादी मदत स्वेच्छेने मंदीर संस्थानवर आणुन द्यावी असे आवाहन सुद्धा अध्यक्षा माँ जिजाबाई सलामे तथा उपाध्यक्ष ह.भ.प. चंद्रभान महाराज दिघडे, समस्त संचालक मंडळी व गावकर्यांनी भाविक भक्तांना केले आहे.
विनोद तायडे वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा