( संग्रहीत )
विनोद तायडे वाशिम
मानोरा येथून जवळच कारंजा महामार्गावर असलेल्या श्री क्षेत्र इंझोरी येथे जगदंबेच्या नवरात्रोत्सवानिमित्त पंचक्रोशित सुप्रसिद्ध असलेल्या माँ जगदंबा संस्थान मंदीरात जगदंबेच्या श्री नवरात्रोत्सवानिमित्त 24 सप्टेेंंबरला ललीता पंचमीचे मुहुर्तावर कारंजा येथील जय भवानी जय मल्हार गोंधळी तथा वाघेमुरळी कलासंच आणि जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ कारंजाचे ह.भ.प. संजय कडोळे, कमलेश कडोळे, ह.भ.प. अजाब महाराज ढळे इत्यादी कलावंतांचा जागर गोंधळाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. सदरहु कार्यक्रमात धार्मिकतेसोबतच राष्ट्रीय कार्यक्रमाकडे ह.भ.प. संजय कडोळे यांनी लक्ष वेधून राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्म समभाव, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान ग्राम सफाई, दारू बंदी व व्यसन मुक्ती तसेच अंधश्रध्दा निमुर्लन व हुंडा प्रथेच्या निर्मुलनावर जनजागृती करून भाविक भक्तांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या शेवटी जोगव्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माँ जगदंबा संस्थान ट्रस्ट इंझोरीचे अध्यक्षा माँ जिजाबाई सलामे, उपाध्यक्ष ह.भ.प. चंद्रभान महाराज दिघडे यांनी केले होते. यावेळी भाविकांची उपस्थिती होती
विनोद तायडे वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा