प्रतिनिधी (राजु दराडे माहुर)
साडेतिन शक्तिपीठा पैकी एक (मूळपिठ )म्हणून प्रसिध्द असलेल्या माहूर गडावर सातव्या माळेचे औचित्य साधून प्रथेनुसार आज दि.27 सप्टेंबर रोजी सुवासिनी व कुमारीका पूजन करण्यात आले.
संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसिलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाल्यानंतर विश्वस्त चंद्रकांत भोपी, आशिष जोशी यांच्या हस्ते संकल्प करून 21 कुमारीका व सूवासिनींचे विधिवत पूजन करून त्यांना संस्थानच्या वतिने सौभाग्य अलंकार , शृंगार साहीत्य, वस्र व दक्षिणा देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ.कृतिका वरणगांवकर यांनी बहिणाबाईची 'लेक जाये सासुराला,लेकीसाठी माहेर करण्याला 'ही भावपूर्ण कविता ऐकवून कूमारीका पूजनाचे विस्तृत महत्व विशद केले. असल्या धार्मिक सोहळ्याच्या माध्यमातून समाजात स्त्री शक्तिचा योग्य तो सन्मान राखला जात आहे. तर मोदी सरकार देशभरात राबवित असलेले ' बेटी बचाव, बेटी पढाव. ' हे अभियान सफल करण्यासाठी प्रसार /प्रचाराचे महत्वपूर्ण माध्यम असल्याचा मनोदय विश्वस्त संजय काण्णव यांनी व्यक्त केला. यावेळी विश्वस्त व मूख्य पूजारी विनायक फांदाडे, संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांचेसह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या सोहळ्याचे पौरोहित्य वे. शा.सं. संदिप काण्णव,चंद्रकांत रिठे,अमोल रिठे ,मोहन फांदाडे,विजय कोरटकर,यांनी केले महाआरतीने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.आज जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी रांगेतील भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुरक्षेची जातीने पाहणी केली आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळण्यासाठी व त्यांची सुरक्षा अबाधीत राखण्यासाठी प्रवेशद्वार मोठे करण्याबाबत त्यांनी विश्वस्त मंडळीशी चर्चा केली.त्यांनी मातेचे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला.मंदिर व्यवस्थापन समितीने केलेल्या व्यवस्थे बाबत समाधान व्यक्त केले.
राजु दराडे
माहुर गड
9011110614

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा