शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

देशात नवरात्र महोत्सवाची धुम आणि दुर्गा बाईचे शौचालय बांधकाम

देशात नवरात्र महोत्सवाची धुम आणि दुर्गा बाईचे शौचालय बांधकाम


 दुर्गाबाई स्वतःशौचालयाचा खड्डा खोदतांना 


विनोद तायडे वाशिम 

जिल्ह्यासह देशभरात नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा देवी चे आगमन होत असतांना बोराळा या गावामध्ये दुर्गाबाई अंभोरे ही महिला कुदळ हातात घेऊन शौचालयाचा खड्डा खोदत असल्याची बाब उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या निदर्शनास आली. स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमानिमित्त गावात एका कार्यक्रमानिमित्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी इस्कापे गावातुन फेरफटका मारत असतांना त्यांच्या नजरेस हे दृष्य पडले. तेव्हा स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने सर्व गावकज्यांसमक्ष त्यांनी या दुर्गेचा सत्कार केला. एवढेच नाही तर उर्वरीत दोन फुट खोल खड्डा खोदण्यासाठी इस्कापे यांच्यसह सोबतच्या अधिकारी वर्गाने दुर्गाबाईच्या घरी श्रमदान करुन शौचालयाचा खड्डा पुर्ण करुन दिला. पतीच्या मृत्युनंतर मुलगा पुणे येथे मजुरीच्या कामासाठी गेल्यामुळे दुर्गाबाई अंभोरे या एकट¶ाच बोराळा येथे राहतात. गावात शौचालयाच्या कामाने गती घेतली तेव्हा या कामात दुर्गाबाई सुध्दा मागे हटल्या नाहीत. कोणताही मजुन न लावता त्यांनी स्वत: कुदळ फावडे हाती घेऊन खड्डा खोदण्यास सुरुवात केली होती. हातावर पोट असलेल्या दुर्गाबाईचा गावात सत्कार झाला आणि जि. प. च्या अधिकाज्यांनी खड्डा खोदुन दिला तेव्हा बार्इंच्या भावना अनावर होऊन त्यांचे डोळे पानावले होते. दुर्गाबाईच्या शौचालयाचा खड्डा खोदल्यानंतर गावात साक्षात दुर्गादेवीचे आणि स्वच्छ भारत मिशन मधील लोकसहभागाचे दर्शन झाले असल्याची भावना उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी व्यक्त केली.

स्वच्छ भारत मिशनचं येडं लागलं गावाला.

बोराळा गावातील प्रत्येकाच्या घरी शौचालयाचे काम सुरु.

जिल्हा परिषदेचेे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा हे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असुन अनेक गावे हागणदारीमुक्त होत आहेत. नुकतेच मंगरुळपीर तालुक्यातील तज्हाळा हे गाव या अभियानांतर्गत हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले असुन वाशिम तालुक्यातील बोराळा या गावाची हागणदारीमुक्तीकडे घोडदौड सुरु आहे.

वाशिम तालुक्यापासुन अवघ्या दहा कि. मी. वर वसलेले बोराळा हे  1230 लोकसंख्येचे गाव आहे.  जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचे वारे वाहत असतांना या ग्रामपंचायतीत एकुण 516 कुटुंबापौकी 408 कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नव्हती. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानातुन प्रेरणा घेत ग्रामसेवक शामलाल बरेटिया यांनी बोराळा हे गाव हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला. या अभियानांतर्गत या गावात गुड मॉर्निंग मोहिम राबवुन उघड¶ावर शौचास  जाणाज्यांकडुन प्रत्येकी बाराशे रुपये दंड करण्यात आला. तसेच लोक कलावंता मार्फत प्रत्येक घरी जाऊन प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली होती. परिणामी शौचालय नसलेल्या 400 कुटुंबांनी शौचालयाचा खड्डा खोदला असुन त्यापौकी सुमारे दोनशेवर शौचालय बांधकामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याचे पहायला मिळाले.  या गावात कामे मोठ¶ा प्रमाणात कामे सुरु असल्याचे ग्रामसेवक बरेटीया यांनी कळविल्यानंतर स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्यासहे सहा. गट विकास अधिकारी शुभदा पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजु सरतापे, माहिती व संवाद सल्लागार राम श्रंृगारे, विस्तार अधिकारी विजय खिल्लारे, स्वच्छता तज्ञ अमित घुले, गट समन्वयक महादेव भोयर, विलास मोरे आदि अधिकाज्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली आणि चमुमार्फत तांत्रिक मार्गदर्शन केले होते.

विनोद तायडे वाशिम
8888277765


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा