शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

मेळघाट येथे अतिदुगम भागात आदिवासींना कपडे व जीवनाश्यक वस्तुचे वितरण

मेळघाट येथे अतिदुगम भागात आदिवासींना कपडे व जीवनाश्यक वस्तुचे वितरण

विनोद तायडे वाशिम


वाशीम:  सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या तरूण क्रांती मंचच्या वतीने सामाजिक बांधीलकीतून दरवर्षीप्रमाणे  20 व 21 सप्टेंबर रोजी मेळघाट येथील अतिदुर्गम भागात आदिवासी महिला, पुरूष , युवक बालकांना नवीन कापडे, साड्‌या , बिस्कीट पुडे, धान्य व शैक्षणिक उपयोगी साहित्य व तरूण सागरजी महाराज यांचे विद्यार्थी पुस्तकाचे वितरण करण्यात आले. दिवाळी पूर्वीच आदिवासी महिला बांधव, बालकांना आगळीवेगळी भेट मिळाली. सोमाणी यांच्या पुढाकाराने आदिवासी यांना विकास व मदतीची घटस्थापना करण्यात आली.

तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, ऍड. भारती सोमाणी आदिंच्या पुढाकार व नेतृत्वात मेळघाट येथील चिखलदरा व सिमाडोह परिसरातील अतिदुर्गम गावात जावून जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. चिखलादरा परिसरातील आमदरी, मोथा, मटकी, टिटू व सिमाडोह परिसरातील गावांचा समावेश आहे.  तरूण क्रांती मंचच्या या उपक्रमामुळे आदिवासी महिला , पुरूष, युवतींचा आनंद व्दिगुणीत झाला तर लहान बालकांमध्ये स्मितहास्य फुलले. यावेळी अनेक आदिवासी महिलांनी शासन आमच्यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र त्या योजनेचा लाभ आमच्यापर्यंत पोहचत नाही. आजही गावात अनेकठिकाणी आवश्यक गरजा , लाईन, पाणी, कपडे यापासून वंचित राहावे लागत आहे.  सोबतच अनेक गावात अशिक्षीतपणा व पुरूषांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शना आले.  तरूण क्रांती मंचच्या या उपक्रमाला  मनोज कापड केंद्राचे संचालक पदमकुमार राऊत,  प्रविण राऊत, मनोज राऊत व सावन राऊत यांनी जवळपास 1 लाख रूपयांचे नविन कापडे उपलब्ध करून दिले. सोबतच दर्जेदार धान्य व बिस्कीट सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांनी स्वत:चे  वैयक्तीक खर्च केले. समाजसेवी डॉ. हरिष बाहेती, डॉ. दिपक ढोके, बाल गणेशोत्सव मंडळ जानकी नगर, स्वामी विवेकानंद शिक्षण व व्यायाम प्रसारक मंडळ धनज बु. , विदर्भ प्रादेशीक माहेश्वरी संघटन आदिंचे सहकार्य लाभले.  कारंजा येथे सामाजिक कार्यकर्ते श्याम सवाई व प्रफुल बानगावकर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.  तरूण क्रांती मंचच्यावतीने मेळघाट येथे जातांना निसर्गानेही आनंद व्यक्त करून मुसळधार पावसाचा वर्षाव केला. पावसामध्येही रात्री उशिरापर्यंत गावात चारचाकी लाईटच्या प्रकाशात साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी सोमाणी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव, व्यसनापासून दूर रहा, शिक्षणाची कास धरा असा महामंत्र दिला.


अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

   मेळघाट येथील अतिदुर्गम भागात गत पंधरा वर्षापासून निलेश सोमाणी यांच्या पुढाकाराने हे सामाजिक अभियान सुरू आहे. पावस व अंधाराची चिंता न करता जो मदतीचा हात देण्यात आला. त्यामुळे अनेक आदिवासी महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.  आपल्या बोलीभाषेतून हुर्रा...हुर्रा या  शब्दाचा उच्चार करून आनंद व्यक्त केला.  आदिवासी लोकांनी आज खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ही दिवाळी असल्याचे सांगीतले.


म्हातारी म्हणाली तु खरा हिरो

मोथा या गावात मदतीचे वाटप सुरू असतांना एका गरीब महिलाच्या घरी चार दिवसापासून पिठ नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी सोमाणी यांनी त्या महिलेला विस किलो  गहु दिले.  यावेळी आशाबाई नावाची एक म्हातारी जवळ आली. तिने डोक्यावर हात ठेवून मुला तुच खरा हिरो आहे असे गौरोदगार काढले.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा