शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत वाहनावर धारदार शस्त्रे लावण्यास मनाई



सम्राट टाइम्स ब्युरो

जिल्ह्यात दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजी नवदुर्गा स्थापना झाली आहे. दि. १ व २ ऑक्टोंबर २०१७ रोजी मालेगाव शहर तसेच ग्रामीण भागात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये शहरातील १५ नवदुर्गा मंडळे सहभागी होणार आहेत. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मिरवणुकी दरम्यान वाहनावर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळे, त्रिशूल, कट्यार अशी घातक, मारक शस्त्रे लावण्यास मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

मालेगाव शहर व ग्रामीण भागात नवदुर्गा व मोहरम विसर्जन मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४-अ अन्वये वाहनांवर धारदार घातक शस्त्रांचा वापर करण्यास मनाई करणारा आदेश निर्गमित केला आहे. तसेच दि. १ ऑक्टोंबर ते दि. ३ ऑक्टोंबर   २०१७ या कालावधीत मोहरम व नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काळात कोणतेही शस्त्र लावण्याबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांसह सामुहिक कवायतीचे किंवा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यास किंवा ते घेण्यास अथवा त्याच्यात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

सम्राट टाइम्स ब्युरो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा