शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिनानिमित्त दि. १ ऑक्टोंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन



सम्राट टाइम्स ब्युरो

जगभरात दि. १ ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारने ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा’ ही थीम ठरवून दि. १ ऑक्टोंबर रोजी सर्वत्र आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दि. १ ऑक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ व नियम २०१० च्या तरतुदीच्या अनुषंगाने विचार विनिमय व माहिती दिली जाणार आहे

सम्राट टाइम्स ब्युरो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा