शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

उमरगा येथे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा




हुकमत मुलाणी
मो-8379832200

उस्मानाबाद /प्रतिनिधी : सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्म स्विकारून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करून त्या आचरणात आणने प्रत्येक बौध्दाचे काम आहे. महिला-पुरुष असा भेदभाव न करता समाज म्हणून प्रत्येकांनी धम्म कार्यात सहभागी व्हावे असे मत सुषमा निकाळजे यांनी व्यक्त केले

तालुका भारतीय बौद्ध महासभा शाखे च्यावतीने शनिवारी (दि.३०) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालिके समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आयोजित केलेल्या कार्यक्रम त्या बोलत होत्या. एन सी गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी उस्मानाबाद येथील गुणवंत सोनवणे, धम्मचारी प्रज्ञाजीत, भारतीय बौद्ध महिला महासभेच्या जिल्हाध्यक्षा विजयमाला धावारे, मकावती कांबळे आदीं उपस्थित होते. पुढे बोलताना निकाळजे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांमूळे आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रगती झाली पण धार्मिक दृष्टीने अजूनही मागासच आहोत. स्वत:चे घर कुटुंब यामध्ये व्यस्त असल्याने डॉ. आंबेडकर यांनी धम्मक्रांती घडवली, मात्र त्यास गतिमान करणे आपणांस अद्याप ही जमले नाही. जिल्हात भारतीय बौद्ध महासभेकडून धम्माचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. प्रज्ञाजीत म्हणाले की, बौद्ध धम्माला प्राचीन इतिहास प्राप्त झाला, देशातील अनेक लेण्या गुंफा व टेकडीवर आज हि इतिहास जिवंत आहे. हा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी करत असतात व त्यातूनच चळवळ निर्माण होत असते. डॉ बाबासाहेब यांच्या सारखे प्रेरणादायी व्यक्तीमत्व देशाला लाभले आहे. धम्माला जगात वेगळे स्थान प्राप्त होत असून जग बुद्धाच्या धम्माकडे आकर्षित होत असल्याने प्रत्येक बौद्धांची जबाबदारी आता वाढली आहे.यावेळी सोनवणे यांचे भाषण झाले. प्रारंभी भगवान बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला पंचशील ध्वज व निळ्याझेंड्याचे रोहन करण्यात आले. धम्ममित्र शाक्यदिप कांबळे यांनी सामूहिक धम्म ध्वज वंदना घेतली.समता सैनिक दलाने मानवंदना दिली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, रिपाईचे सुभाष सोनकांबळे, कमलाकर सूर्यवंशी, मच्छेद सरपे, श्रीधर सरपे, दिलीप सुरवसे, निखिल गायकवाड, प्रभाकर गायकवाड, जीवन सूर्यवंशी, दगडू सूर्यवंशी, नवनाथ गायकवाड, चंद्रकांत गायकवाड,  लक्षमण कांबळे, दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती. महासभेचे तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी प्रास्ताविक केले मिलिंद डोईबळे यांनी सूत्रसंचलन केले. यशवंत भालेराव यांनी आभार मानले.


हुकमत मुलाणी-उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा