शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

विजया दशमीनित्ताने उमरगा येथे शोभा यात्रा



हुकमत मुलाणी
मो-8379832200


विजयादशमी निमित्त शनिवारी (दि.३०) सायंकाळी हुतात्मास्मारकापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपट्याची पाने वाटून सीमोल्लंघन साजरा होवून सायंकाळी रावण दहन करण्यात आले.

नवरात्रोत्सवातील नऊ दिवसाच्या विविध कार्यक्रमानंतर दसरा मुहूर्तावर सायंकाळी पाच वाजता हिंदू बांधवांनी विजयादशमी-निमित्त हुतात्मास्मारकापासून काढलेल्या भव्य शोभा यात्रेत लक्षवेधक पेहराव करून युवक-युवती व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मुख्य रस्त्यावरून निघालेल्या शोभायात्रेत सादर करण्यात आलेल्या कवायती सर्वांचे लक्षवेधून घेत होत्या. पालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सीमोल्लंघन फेरीत शोभायात्रा सहभागी होवून प्रमुख मानकऱ्याच्या हस्ते पूजन झाल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना आपट्याची (सोन) पाने देवून सीमो-ल्लंघन साजरा केला, त्यानंतर शोभायात्रा पंचायत समितीच्या प्रांगणात आल्यावर रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी माऊली प्रतिष्ठान अध्यक्ष उमाकांत माने, बाळासाहेब माने, डॉ चंद्रकांत महाजन, अनिल धारूरकर, प्रविण स्वामी, संजय पवार, संजय ढोणे, रोहित सूर्यवंशी, आकाश शिंदे, गिरीश सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, काका जाधव, विनोद कोराळे, किसन दामावले, सचिन जाधव,सुनिल माने,शरद पवार, अभिजित चव्हाण, किशोर शिंदे, शरणप्पा येळापुरे, गोपाळ आष्टे, राजु दामाशेटी, बाबूराव सुरवसे, रवि पोतदार, सोम बनसोडे, पालिकेचे सुरेश भोसले, करबस शिरगुरे, शेषेराव भोसले यांच्यासह हिंदु बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


हुकमत मुलाणी-उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा