वाशिम - बुध्द धम्म व संघ तत्वप्रणालीस अनुसरुन स्थानिक नालंदानगर येथे शनिवार, 30 सप्टेंबर रोजी 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कायर्र्क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी 8 वाजता पुज्य भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात येईल. त्यानंतर साडेआठ वाजता महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व पंचशिल त्रिशरण घेतल्या जाईल. पावणे नऊ वाजता प्रा. मुकुंद वानखेडे हे 22 प्रतिज्ञांचे पालन करतील. त्यानंतर 9 वाजता शहरातून धम्मरथ रॅली काढण्यात येईल. रात्री 8 वाजता वर्तमान भारतातील सामाजीक समस्येवर धम्मचक्र प्रवर्तनाची गरज आणि उपाय या विषयावर सावित्रीबाई फुले विचारमंचचे अध्यक्ष सौ. किरण समाधान गिर्हे यांचे जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमास समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष प्रमोद ज्ञा. खिल्लारे, अनिल ताजणे यांनी केले आहे.
Samrat time's

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा